नाच मेरी बुलबुल की पैसा मिलेगा ..... आता तरी गृहमंत्री इथे लक्ष देतील का ?

नाच मेरी बुलबुल की पैसा मिलेगा ..... आता तरी गृहमंत्री इथे लक्ष देतील का ?

      अश्लील नृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या व प्रोत्साहन देणाऱ्या नाईट सिटी ऑर्केस्ट्रा बार मधील २७ इसमांवर कारवाई !

      हल्ली डान्सबार ऑर्केस्ट्रा बार वर बंदी असताना अजूनही थोरा मोठयांच्या आशीर्वादाने काही हप्ते वसुली करणाऱ्या सरकारी लाच खाऊ ऑफिसरच्या आशीर्वादाने कितीतरी लेडीज बिअर बार, ऑर्केस्ट्रा बार अजूनही चालू आहेत. ज्यावेळेस आर.आर.पाटील हे गृहमंत्री होते त्यावेळेस त्यांनी लेडीज डान्स बार, ऑर्केस्ट्रा बार ह्यावर कडक कारवाई केली होती. परंतु हल्ली त्यांच्याच पक्षाचे विदयमान गृहमंत्री ह्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केल आहे. डान्स बार ऑर्केस्ट्रा बार अमली पदार्थ विक्री अशा किती तरी गुन्ह्यांना नुसता उत आला आहे. बेरोजगारीच्या नावाखाली अंमली पदार्थ विकणे, लेडीज ऑर्केस्ट्राबार चालवणे स्त्रियांना स्वेच्छेने, इच्छेविरुद्ध ऑर्केस्ट्रा बार मध्ये अर्ध नग्न उघड्या नागड्या करून  घाणेरडे अश्लील चाळे करुन नाचवणं अस सर्रास चालू आहे आणि बार मध्ये काम करणाऱ्या कितीतरी बायका स्वस्ताच्या मर्जीने सुद्धा असली कामं करतात.

          दिनांक ८ मे रोजी बातमीदारामार्फत मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे अंतर्गत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे अधिकारी यांना पक्की बातमी मिळाली की मुंबई अहमदाबाद हायवे सर्विस लगत मिरागाव काशीमीरा ता.जि. ठाणे येथे असलेला नाईटसिटी ऑर्केस्ट्रा बार येथे आस्थापनेचा मॅनेजर, कम कॅशियर, कर्मचारी यांनी आपसात संगनमत करून, आस्थापनेच्या हॉलमधे बार मधील मुलींना अर्ध नग्न कपडे घालून अश्लील चाळे करीत अश्लील नृत्य करण्यास भाग पाडून प्रोत्साहन देत आहेत.

          सदर मिळालेल्या बातमी वरून पोलिसांनी सापळा रचला व नाईट ऑर्केस्ट्रा बारवर छापेमारी केली असता सदर ठिकाणी आस्थापनेचा मॅनेजर कम कॅशियर, यांच्या सोबत वेटर, वीस इसम, तसेच गिऱ्हाईकांनी उधळलेल्या चलनी नोटा गोळा करणारे नोकर, तसेच नृत्य करण्यास प्रोत्साहन करणारे व पैसे उपलब्ध करून देणारे सात इसम असे एकूण २७ आरोपींना अटक करण्यात आली. बारमध्ये अर्धनग्न कपडे घालुन अश्लील कृत्य करून नृत्य करण्यास बंदी असताना सिटी नाईट ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांकडून असली अश्लील कृत्य व नृत्य करण्यास भाग पाडणारे व पोलिसांना हवे असलेले बारचे मालक चालक, तसेच वीस नोकर, सात ग्राहक असे एकूण २७ आरोपींना अटक करून बारमध्ये उधळण्यासाठी वापरलेली ६६९००/-रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

          सदर कारवाई बाबत काशीमीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं.३०२/२०२२ महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे आणि मध्यपान कक्ष (बाररूम), नृत्य अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्या बाबत व बार मध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ चे कलम ३.८. (१) (२) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          सदरची कारवाई डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे, श्री. अमोल मांडवे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ कक्षाचे पोलीस निरीक्षक देवीदास हंडोरे, महिला सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री शिंदे, नेमणूक भरोसा सेल, पोलीस हवालदार पवन, पो हवा.पाटील, धनाजी इंगळे, पोलीस शिपाई अजय यादव यांनी केली.

           असल्या ऑर्केस्ट्राबारवर बंदी असताना गृहमंत्र्यांची प्रशासन व्यवस्था याबाबतीत डखमडौल आहे आणि ह्या सर्वांवर पूर्णतः कडक कारवाई करून बंदी आणणार कधी ? दिवंगत पूर्व गृहमंत्री यानी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ह्या वरील सर्व बाबींवर कडक कारवाई केली होती. आता पुन्हा लेडीज ऑर्केस्ट्रा बारला उत आला आहे कधी कधी राजकीय पक्षाच्या दबावाखाली कितीतरी कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी यांना असल्या बारवर कारवाई करता येत नाही. मग आता सत्तेत विध्यमान असलेले महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना स्त्रियांची मानहानी प्रतिष्ठेची पर्वा नाही का ?  हा प्रश्न इथे उद्भाभवत आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week