मिक्सरची स्कुटीला धडक, महिला मिक्सर खाली चिरडून जागीच ठार !

मिक्सरची स्कुटीला धडक, महिला मिक्सर खाली चिरडून जागीच ठार !

         रोज कुठल्यानं कुठल्या वाहनांचे  प्राणांकित अपघात घडत असतात. मग ह्या अपघातात नक्की दोषी कोण? आजकाल वाहनांची खूप कोंडी होत असते. कधी सिग्नलचा प्रॉब्लेम असतो, तर कधी ट्रॅफीक हवलंदारांचा जागेवर पत्ता नसतो. त्यामुळे काही वाहन चालक हव्या तश्या मर्जीने आपली वाहनं वेग मर्यादा न राखता चालवीत असतात आणि विशेषतः अवजड वाहनांचे वाहन चालक हे ह्या बाबतीत जरा जास्तच निष्काळजी पणाने वाहन चालवत असतात. मध्यपान करून वाहन चालवणे, वाहतूक नियमांच उल्लंघन करून वाहन चालवणे, लहान वाहनांना कधी धक्का पोहचणे हयामुळे कधी प्राणांकीत अपघात होतात व बिचारे लहान वाहन चालक (बाईक, स्कुटी). यांना नाहक आपले प्राण गमवावे लागतात.  असाच एक अपघात देवनार पोलीस ठाणे यांच्या हद्दीत घडला.

            दिनांक ७ मे ०२२ रोजी १३:४५ वा. सुमारास फिर्यादी श्री. मिझान मुबारक शेख, वय वर्ष २६ हा राहणार प्लॉट नं.६ रूम नंबर ०८ रोड नंबर ०८ शिवाजी नगर, गोवंडी मुंबई हे हनुमान मंदिर समोर वा. तु. पाटील मार्ग, नीलम जंक्शनकडे जाणारी वाहिनी गोवंडी मुंबई येथून फिर्यादी व त्यांची मैत्रीण अरशिया खान हिच्या सोबत त्याची स्कुटी क्र.एम एच ०३ डी एफ ३८३३ वरून चेंबूर येथे जात होते. त्यावेळेस अटक आरोपी याने त्याच्या ताब्यातील मो / मिक्सर एम एच ०४ जे के ४३४९ याने हयगयीने भरधाव रस्त्याच्या कडेने वाहन चालवत असलेल्या मिझान शेख यांच्या स्कुटीला मागून जोरात धडक दिली. धडक स्कुटीला लागल्यामुळे फिर्यादी यांची मैत्रीण ही स्कुटी वरून खाली पडली व मिक्सरच्या खाली आली. त्यामध्ये तिच्या डोक्याला गंभिर दुखापत झाली. त्यामुळे भयंकर रक्तस्त्राव होऊन मिझान शेख यांची मैत्रीण अरशिया खान हिचा जागीच मृत्यू झाला. 

       म्हणून फर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून कलम ३०३ (अ), ३४८,२७९ भारतीय दंड विधान सह १८४ मोटार वाहन कायदा अनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    असे होणारे गंभीर अपघात व ह्या अपघातास कारणीभुत होणारे मिक्सर डंपर, ट्रक बस यांचे वाहन चालकांच्या चुकीमुळे कितीतरी लहान वाहनांचे वाहन चालक व पादचारी यांना नाहक आपले प्राण गमवावे लागतात ही अतिशय गंभीर बाब आहे व असे प्राणांकीत अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमात अधिक सुधारणा व कडक शासन करण्यात यावे त्याजोगे प्राण गमवावे लागणार नाहीत अशी प्रतिक्रिया जनता व्यक्त करीत आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week