लॉजिग बोर्डिंग भी बनगये, फाँकलँडरोड !

लॉजिग बोर्डिंग भी बनगये, फाँकलँडरोड !

        किती अस्ताव्यस्तता रे ही..." ? 

पोलिस ठाण्यात पाटील साहेब कर्तव्यावर असलेल्या काॕन्स्टेबलला बोलत होते..

" चला ! आज रॕक मधल्या सगळ्या फाईल्स व्यवस्थित सिक्वेंन्स प्रमाणे लावू.." 

    पाटील साहेब आपल्या सहका-यांसोबत फाईल्स व्यवस्थित लावण्याच्या कामात मग्न होते. 

तितक्यात शिवा ठाण्यात दाखल झाला. शिवा पाटील साहेबांचा विश्वासू खब-या..

" बोल शिवा..काय म्हणतोस" ? पाटील साहेब .

' साहेब एक गुप्त बातमी मिळाली आहे' शिवा .

"कसली आणि कुठली बातमी आहे रे आता? "पाटील प्रश्नार्थक बोलले .

तसा शिवा सांगू लागला. 

शांतपणे ऐकल्या नंतर पाटील साहेबांनी सगळ्या स्टाफ ला मिटींग हाॕल मध्ये बोलावून घेतले . तब्बल एक तास चर्चा झाल्या नंतर मास्टर प्लॕन तयार झाला .

        घटना अशी की , 

हिल टाॕप लाॕजींग बोर्डींग, वरसावे गाव, घोडबंदर रोड, काशिमिरा येथे छुपा वेश्या व्यवसाय चालू असल्याची बातमी खब-या शिवाला मिळाली होती आणि त्याच्या मार्फत पाटील साहेबांना मिळाली.

      लाॕजींगचा वाॕचमन लाॕज वर थांबत असलेल्या ग्राहकांना मोबदला घेऊन मुली पुरवत असायचा.. या प्रकरणात लाॕजचे मॕनेजर, वेटर लाजचा वाॕचमन पुरणसिंग यास सहकार्य करत असत.

    अर्थात तिघांच्या संगनमताने हा गोरखधंदा हिल टाॕप लाॕजवर गेल्या कैक दिवसांपासून चालू आहे..

    ठरलेल्या योजने नुसार दि 25 . 05 . 2022 रोजी धाड टाकण्याचे होते. दुपारी एक पंटर (बनावट ग्राहक ) लाॕज वर जाणार होता..

पंटर लाॕजवर जातो..

' गुड नून मॕनेजर साहेब'! पंटर कमालीच्या शिष्टाचारात मॕनेजर समोर उभा .

" बोला..काय म्हणता सर.. रूम हवी का ? बाहेर गावचे दिसताय तुम्ही " 

मॕनेजर रमेशा बोलला .

' होय सर..दादर वरून जिन्स पँट्स न्यायला आलोय..गावी माझं कापड दुकान आहे. उद्या सकाळी दहाला मार्केट उघडल्यावर मी चेक आऊट करेन .

चालेल ना ' ? 

पंटर एका दमात आपले व्यवसाय उदिष्ट सांगून मोकळा झाला...

" ए पिंटू..साहेबाला चौदा नंबर ची खोली उघडून दे " 

मॕनेजर ने रुम बाॕय ला फर्मान सोडले .

     ठराविक कागदपत्रे तपासल्या नंतर मॕनेजर नी रूम दिली . ग्राहक रुम मध्ये आल्या नंतर फ्रेश होऊन वरिष्ठ पोलिस निरिक्षक पाटील साहेबांना फोन करतोय..

' हं सर..पहिला कदम कामयाब ! ग्राहकाने आपले कर्तव्य बजावले .तसे पाटील सांहेबांनी ओळखून घेतलं की लाॕज ची खोली मिळाली आहे .

     थोड्या वेळाने ग्राहक नेहरू शर्ट ट्राऊजर कपाळी चंदन लावलेल्या वेषात खाली उतरतो. लाॕज समोर वाॕचमनच्या बाजूला उभा रहातो .

    ग्राहकाने पँटच्या खिश्यात हात घालून गाय छाप तंबाखू काढली .

' घ्या ..! ' वाॕचमनला खाण्यासाठी विनंती केली..

" सहाब मै सिगारेट का आदी हुँ " वाॕचमन पुरणसिंग बोलला .त्याने सिगारेट पेटवून झुरके घेत पंटर शी बोलत होता .

' मन लागत नाही हो..खूssप बोअर होतंय आज..अजून तर रात्र जायची आहे . . .' 

पंटर बोलला .

" मुड फ्रेश करना है तो बोलो.. हमारे पास सब इंतजाम है ! " 

ग्राहक पटवून कमिशन मिळविण्याच्या नेहमीच्या लालसेत पुरणसिंग बोलला .

पंटर सहज स्मित हास्य करून आशावादी नजरेत पुरणसिंग कडे पहात असलेला..

" यह बंबई बहोत रंगीन है सहाब..आप अगर हाँ कहे तो आज की रात आपकी चाँद पे सैर करा दे सकता हुँ । " 

वाॕचमन ठाम निष्चयात सांगत होता .

पंटर बार रेस्टारेंट बद्दल विचारत होता पण पुरणसिंग ला आजच्या ग्राहकाचे कमिशन मिळवायचेच होते .

" सब मिलेगा..! शराब भी शबाब भी " ! पुरणसिंग ठामपणे बोलला .

' सच्ची मे ना ' ? पंटर आशावादी मुद्रेत विचारत होता .

वाॕचमन पुरणसिंगने आपला मोबाईल ओपन करून पाच सहा मुलींचे फोटो दाखविले .

पंटर ने जी निवडली तिचा रेट  ठरवून झाले .आणि वाॕचमन चे कमीशन ही ठरले .

" तुम रुम मे जाओ..मै फोन करके चाँद को बुला लेता हुँ तुम्हारे रुम पे घंटे मे आ जाएगी " वाॕचमन बोलला .

पंटर ग्राहक रूम मध्ये येऊन पाटील साहेबांना इत्यंभूत माहिती दिली .

इकडे पाटील साहेब आपल्या सहका-या सोबत मिशन वर गाडी घेऊन निघाले...

लाॕज च्या कांही अंतरावर कांही वेळात येऊन थांबले .

लाॕज च्या पंटर ने ठरवेल्या खोलीत सात च्या आसपास ती मुलगी आली .

' ये..बस तिथे त्या काॕटवर ' 

पंटर त्या मुलीला बोलला. तशी ती बसली. नंतर सहज पंटर ने आपल्या मोबाईल वरून पाटील साहेबांना व्हाट्सअॕप मेसेज केला .

' सर..आता पुढील कामगिरी तुमचची'! 

जसा हि मेसेज मिळाला, पाटील साहेब आपल्या सहका-या सोबत लाॕजच्या मॕनेजरच्या काऊंटर समोर हजर झाले. आय डी कार्ड दाखवून वाॕचमनचा वेटरचा तथा मॕनेजरचा मोबाईल जप्त केला. तिघांना ही स्थानबध्द करून सगळ्या खोल्यांची झडती सुरू केली .

    ठरल्या प्रमाणे पंटरच्या खोलीतून लेडी काॕन्स्टेबल च्या सहाय्याने त्या मुलीला प्रथम ताब्यात घेतले .

नंतर मॕनेजर वेटर वाॕचमन यांना ही ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता वाॕचमन पुरणसिंग याने मुलीला बोलविल्याचे व मुलगी पुरविल्याचे निष्पन्न झाले .

1 ) मॕनेजर रमेश भिवा वाडु वयः ४५ वर्ष 

2 ) पिंटू सुदाम ठाकुर वयः ३८ वर्ष 

3 ) वाॕचमन पुरण पदम सिंग वयः ४३ वर्ष  

     या तिघांना अटक करण्यात आली .

सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री उमेश हरी पाटील यांनी सरकार तर्फे फिर्याद दाखल केली.

     काशिमिरी पोलिस ठाणे कलम ३४६ / २०२२ भारतीय दंड विधान सह ३७० ३४ तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३ ४ ५ ७ प्रमाणे लाॕज चे चालक व मालक यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला .

       सदर कार्यवाही श्री डाॕ महेश पाटील पोलिस उपायुक्त ( गुन्हे ), श्री अमोल मांडके पोलिस आयुक्त ( गुन्हे ) मि भा व वि पोलिस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संपतराव पाटील, सहायक पोलिस निरक्षक उमेश पाटील , विजय निलंगे, रामचंद्र एस पाटील, पोलिस शिपाई केशव शिंदे, सहा पोलिस हवालदार सुप्रिया तिडले, सहा.पोलिस हवालदार सम्राट गावडे अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांनी केली आहे .

(प्रद्युम्न देशपांडे)


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week