ऑनलाईन लोन घेताना सावधान, आगे खतरा है !!
मनुष्य म्हटला म्हणजे जीवन आलं आणि हे जीवन जगताना त्याला नाना विविध अडचणी ना तोंड घ्यावं लागतं. घर परिवार मुलं घरातील काही लोकांच्या, अथवा स्वतःच्या ईच्छा पूर्ती करण्यासाठी त्याला पैशाची गरज लागत असते परंतु कधी कधी अपुऱ्या पडणाऱ्या पैशांमुळे तो स्वतःच्या ईच्छा पूर्ण करू शकत नाही. मग अशा वेळी कर्ज घेऊन ईच्छा पूर्ती करीत असतो. परंतु नामचिन बॅंकांना पुरेसे कागदपत्र असल्याशिवाय त्या कधी ही लोन देत नाही. त्यामुळे काही लोक पतपेढीतून कर्ज घेतात. आता तर इंटरनेटचा जमाना आहे, सर्व गोष्टी घरबसल्या मिळतात परंतु ऑनलाईन काही मागवणे जितक सोपं तितकच फसवं असत. आणि आता तर इझी ऑनलाईन लोनही मिळतात. आणि 10 15 हजार लोन तर ऑनलाईन सहज मिळते परंतु अशा इझी लोन देणाऱ्या बॅंका कितपत खऱ्या असतात? लोन देण्याच्या बहाणे "ऑनलाईन इन्स्टंट लोन अँप"च्या माध्यमातून सामान्य जनतेची आर्थिक फसवणूक व मानसिक छळ करतात.
अश्याच एका ऑनलाईन इन्स्टंट लोन अँप चा मुंबई गुन्हे विभागाने पर्दाफाश केला.
मुंबई शहर तसेच संपूर्ण देशात Instant Loan App च्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे, ग्राहकांना प्रत्यक्ष कॉल करून तसेच sms द्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून online link पाठवून व मोबाईल Play Store च्या माध्यमातून Loan App डाऊन लोड करण्यास सांगून त्याद्वारे तात्काळ व सोप्या पद्धतीने Online लोन उपलब्ध करून दिले जात आहे.
सदर लोन अँप हे गरीब आणि गरजू लोकांना अत्यंतीक तात्काळ घरबसल्या मिळते. मोबाईल अँप द्वारे ५ ते १० हजार इतक्या रकमेचे कर्ज दिले जात असल्याने अशा लोन अँपच्या माध्यमातून मिळणाऱ्या लोनचा व्याजदर अवाजवी असून अँप डाउनलोड करताच पीडित व्यक्तीचे कॉन्टॅक्ट डिटेल, सोबत माईक कॅमेरा मेसेज यांचा एक्सेस लोन कपंनीकडे जातो. तसेच लोन अँप वर सादर केलेली सेल्फी, पँन, आधारकार्ड असा महत्वाचा डाटा संबंधित कंपनीकडे संकलित केला जातो. त्याद्वारे रिकव्हरीला उशीर करणाऱ्या टाळा टाळ करणाऱ्या ग्राहकांना त्रास दिला जातो. तसेच रिकव्हरी दिली असली तरी लोन aap कंपनी अधिक वसुली करण्याच्या हव्यासापोटी त्याने दिलेल्या फोटो एक्सेस मुळे सदर गँलेरितील फोटो वॉट्सअपच्या माध्यमातून त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील सर्व लोकाना प्रसारित करतात व नुसत अँप डाउनलोड करणाऱ्यांचा हा मानसिक छळ केला जातो.
ह्या प्रकरणी प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याने फिर्यादी यांच्या जबाबावरून गुन्हा नोंद केला. फिर्यादी यानी आईच्या वैदयकीय उपचारासाठी एकूण १० लोन ह्या अँपद्वारे ३,८५,००० इतक्या रकमेचा लोन घेतला होता व सदर लोनच्या परताव्यापोटी त्यांनी २२,००,००० इतकी रक्कम लोन कंपन्यांना दिली इतकी रक्कम त्यानी भीती पोटी अश्लील फोटो व्हायरल होऊन, तसेच कम्पनीने दिलेल्या धमकीला घाबरून दिली. ह्या गुन्ह्याच्या तपासात एकूण १४ आरोपींना अटक करण्यात आली.
अश्या गुन्ह्यात एकूण २०० बोगस कंपन्या समोर आल्या आहेत. बनावट कँपन्यांच्या माध्यमातून ग्राहकाकडून वसूल केलेला पैसा पुढे क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातुन ५० पेक्षा जास्त क्रिप्टो वाँलेट्सवर वळीवला जातो. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींकडुन एकूण २११ सिमकार्ड, ३९ मोबाईल, ११ लेपटॉप्स, ०२ हार्डडिस्क, १ एस एस डी, ०३ राऊंडर, सिमकार्ड लपवण्यासाठीची दोन पुस्तके इ मालमत्ता जप्त करण्यात आली. तसेच बनावट कंपन्यांची व इतर अशी ३६० पेक्षा जास्त खाती गोठवण्यात आली आहेत. त्यामध्ये अध्याप पावतो १४,००,००,०००/-(रुपये चौदा कोटी) पेक्षा जास्त रक्कम शिल्लक आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी आवेज अहमद वय वर्ष २९ बेंगलोर, विपुल शंकर गौडा वय २४ वर्ष बेंगलोर, स्नेह समीर सोमानी वय वर्ष ३० मालाड पूर्व, संजय वीरभान अरोरा वय वर्ष २८ गुडगाव हरियाणा, विघ्नेश आंनद वय २८ वर्ष बेंगलोर, मल्लीया चिक्कमय्या कुरुबा २४वर्ष बेंगलोर, लियांग ची शेंग वय ३९ बंगलोर मूळ कलकत्ता, अजय कुमार विजय कुमार वय २५ बेंगलोर, प्रियांशी शेखरचंद कांडपाल वय वर्ष२४ हल्दी घाटी उत्तराखंड यांना अटक करून भारतीय दंड विधान कलम ४१९,४२०,४३७,४७१,३८४,१२०ब, ५०९,५००,३४ सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ची कामगिरी सायबर क्राईम मुंबईच्या पथकाने मा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मा सह पोलीस आयुक्त गुन्हे श्री सुहास वारके, मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री एस विरेश प्रभू, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त सायबर गुन्हे श्री हेमराजसिह राजपूत साह्ययक पोलीस आयुक्त सायबर विभाग श्री रामचंद्र लोटलीकर, प्र महिला पो.निरीक्षक सुवर्णा शिंदे, पोलीस निरीक्षक मोरे, प्रकाश वारके महिला पोलीस निरक्षक सुवर्णा शिंदे, महिला पोलीस निरीक्षक मौसमी पाटील पोलीस निरीक्षक मंगेश देसाई , पो निरीक्षक मंगेश मजकर, म पो नि वैशाली श्रावणी, पो. नि. समीर लोणकर, पो नि महेंद्र जाधव, सहाय्यक पो निरीक्षक प्रवीण मोहिते, सपोनि संजय पवार, सपोनीअमित उत्तरेकर, सपोनि हनुमंत काळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुराधा पाटील, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी होळकर, पो उप निरीक्षक अजय पाटील, धनवेश पाटील, प्रकाश गवळी, पो उप निरीक्षक राहुल खेत्रे, पो उप निरीक्षक गणेश शिर्के, सायबर पोलीस ठाण्यातील अंमलदार यांनी यशस्वी केली.