
दम मारो दम !
नशा ! मदमस्त होण्याचं एक साधन ! तशा तर नशा अनेक प्रकारच्या आहेत, दारू सिगारेट, चिलीम, तंबाखु आणि आणखी तणाव विसरण्यासाठी ड्रग्जच सेवन कितीतरी जण करतात. आणि हल्ली तर गल्ली बोळात ड्रग्सचे विक्रेते आहेत. ह्या अमली पदार्थात हल्ली मेफेड्रॉन ह्या अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात सर्रास विकला जातो आणि मेफेड्रॉन बनवण्याचा फार्मूला हा नायजेरिया मधून भारतात आला आहे. मेफेड्रॉन हा अतिशय घातक असलेला अंमली पदार्थ, बनवणं खूप सोपं आहे काही रासायनिक द्रव्य मिसळून हा मेफेड्रॉइन घरी सुद्धा बनवता येतो.
अशा ह्या मेफेड्रॉन हा नालासोपारा इथं बनवून मुंबई व आजूबाजूच्या परिसरात विक्री करणाऱ्या एका इसमास मुंबई NCP विभागाने अटक केली.
अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी, युनिट यांनी एकूण ७०१ किलो ७४० ग्रॅम वजनाचा व रुपये १४०३ कोटी ४८ लाख किमतीचा 'एम डी' मेफेड्रॉन सदृश्य अंमली पदार्थ जप्त केला व अवैध रीतीने त्याचा व्यापार करणाऱ्या मोठ्या टोळीस गजाआड केले. दिनांक २९ जुलै २२ रोजी माता रमाबाई आंबेडकर मनोरंजन मैदान समोर घाटकोपर- मानखुर्द, लिंक रोड शिवाजी नगर गोवंडी २) प्लॉट नो ४४ लाईन-एन, रुम नो.२ शिवाजीरोड नं ३ येथे एम डी ची विक्री होत असल्याचं समजले होते. नंतर दिनांक ३ ऑगस्ट २२ रोजी सीताराम बिल्डिंग को. हा. सो. गाला नं १ हनुमान रोड नालासोपारा वेस्ट इथे एका इसमास मेफेड्रॉन सहित ताब्यात घेण्यात आले. आरोपी जवळ कसून चौकशी करून अजून ५ जण ह्यात सामील असल्याचं समजले. ह्यात ४ पुरुष व एक महिला आरोपी असल्याची माहिती मिळाली.
पोलीस तपासात प्राथमिक माहिती मिळाली की मुख्य आरोपी ह्याने रसायन शास्त्रामध्ये ऑरर्गँनिक केमिस्ट्री चे शिक्षण घेतलेले असून वेगवेगळे केमिकल एकत्रित करून त्यावर वेगवेगळे रासायनिक प्रयोग करून मेफेड्रॉन बविण्याचे ज्ञान त्याने आत्मसात केले व मागणी प्रणाने तो एम डी पुरवितो असे समजले.
पाहिला आरोपी ह्यांच्याकडून २५० ग्रॅम ३७,५०,०००/- किमतीचा मेफेड्रॉन मिळाला.
दुसऱ्या आरोपी कडून 2 किलो ६७० ग्रॅम एम डी रुपये ०४,१४,००,०००/- किमतीचा माल हस्तगत करण्यात आला.
सदरच्या गुन्ह्यात एकूण पाच आरोपी अटक करण्यात आले असून एकूण ८४० ग्रॅम वजनाचा एम डी हा अमली पदार्थ किंमत एकूण १४०७,९९,५०,९००/- जप्त करण्यात आला. सदरची यशस्वी कामगिरी मा पोलीस आयुक्त श्री विवेक फनसळकर, मा सह पोलीस आयुक्त गुन्हे श्री सुहास वारके, मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री विरेश प्रभू, मा पोलीस उप आयुक्त श्री दत्ता नलावडे व मा सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सावळाराम आगावणे अंमली पदार्थ विरोधी कक्ष मुबई यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरळीचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप काळे, सहायक पो. निरीक्षक संतोष साळुंखे, पोलीस हवालदार सुधीर साळुंखे, राजू तडवी, पोलीस नाईक हरीश राठोड, पोलीस नाईक राजदीप दळवी, पोलीस नाईक प्रीतम ढोरे, नितीन जाधव, हणमंत येडगे, पोलीस शिपाई महेश गायकवाड, आकाश शेलार, जाधव यांनी पार पाडली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक रवींद्र सावंत हे करीत आहेत.