अंमली विरोधी कक्ष बांद्रा युनिट ने केला गांजा जप्त !!

अंमली विरोधी कक्ष बांद्रा युनिट ने केला गांजा जप्त !!

             गांजा जास्त नशा देणारा पदार्थ, गांजा हा गेली ८००० वर्षांपूर्वी पासुन सर्वांना ज्ञात आहे. तर भारतात हजारो वर्षापासुन गांजाच सेवन केले जात आहे. अथर्ववेदात वनस्पतीच्या माहिती मध्ये गांजा चा उल्लेख आढळतो. पाच महान रोपांमध्ये गांजाचा उल्लेख आढळतो. गांजा ही एक आयुर्वेदातील महत्वाची वनस्पती आहे. गांजाचा उपयोग बऱ्याच रोग व्याधी उदाहणार्थ भूक न लागणे, मिर्गी, येणे कँसर, मळमळणे, अशा कितीतरी व्याधींवर गांजा हे औषध म्हणून वापरले जाते, गांजाला  इंग्लिश मध्ये मैरुआना, तर मेडिकल सायन्स मध्ये केनेबिस तर हिंदीत त्याला भांग का पौधा म्हणतात.

         गांजाच्या फुला पासून चरस तर गांजाच्या कोवळ्या पानावर राळे सारखा पदार्थ येतो त्यापासुन रेजिन बनवतात त्यापासून कागद, रस्सी इ सारख्या वस्तु बनवतात. तर गांजाची पाने सुकवून व बिजा पासून भांग तयार करतात होळी सणाला भांगेच सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. गांजा हा जीवघेणा अंमली पदार्थ नसला तरी तो अतिशय नशा देणारा पदार्थ आहे. तणाव मुक्तीसाठीही गांजा ओढतात. परंतु गांजा पिऊन कोणी मरण पावला अस आढळून आलेलं नाही. गांजा मध्ये THC हा नशा देणारा पदार्थ आढळतो. तो मनुष्याच्या मेंदूवर परिणाम करतो. त्यामुळे गांजाच सेवन केले असता मनुष्य जी कल्पना करतो त्यात तो जादा इंटरेस्टिंग वाटून मजा येते.

         १९८५ पूर्वी गांजा विकणे सेवन करणे ह्यावर बंदी नव्हती. मात्र १९८५ साली राजीव गांधीच सरकार आले व त्त्यानीं NDPS (नारकोटिक्स ड्रग्स सायकोट्रॉपिक सब्सटेन्स) १९८५ हा अँक्ट लावून गांजा सेवन व विक्री वर बेन लावला गेला. बेन लावल्यानंतर  गांजाची अवैध रित्या विक्री सुरू झाली नशेसाठी गांजाच हल्ली मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यामुळे त्याची गणना आता अंमली पदार्थात केली जात आहे.

      दिनांक ९/८/०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाला गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम रात्री च्या वेळेस मारुती सुझुकी या वाहनातून येऊन मोठ्या प्रमाणात मुंबई व त्याच्या उपनगर परिसरात गांजा ह्या अंमली पदार्थांची विक्री करतो, असे निष्पन्न झाले. सदर खबर मिळताच पो नि संजय चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक सुरेश भोये, सहा पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर व पोलीस पथकाने ऐरोली जंक्शन जवळ भांडुप पूर्व मुंबई या ठिकाणी सापळा रचून दोन इसमांना दोन मारुती सुझुकी एस एक्स ४ मोटार कार सह एकूण २६६ किलो गांजा हा अंमली पदार्थ ताब्यात घेऊन जप्त केला.

          जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थात एकूण २६६ की वजनाचा गांजा अंदाजे की रु ६६,५०,०००/- व दोन मारुती सुझुकी कंपनीची एस एक्स ४ किंमत रु १६,००,०००/- असा एकूण ८२,५०,००० इतका मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी पहिला वय वर्ष ३२, दुसरा आरोपी वय वर्ष २४ याना अटक करून भारतीय दंड विधान कलम १६२/२०२२, कलम ८ क, सह २० क २९ एन डी पी एस अँक्ट १९८५  वरून गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

       सदरची कामगिरी पोलीस सह आयुक्त गुन्हे श्री सुहास वारके, मा अपर पो आयुक्त गुन्हे श्री विरेश प्रभू, मा पोलीस उप आयुक्त श्री दत्ता नलावडे, अंमली पदार्थ विरोधी कक्ष मा सहा पोलीस आयुक्त आगवणे, अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली  बांद्रा युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, सहा पो निरीक्षक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक सुरेश भोये, सहा पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर, पोलीस हवालदार तळपे, देसाई, पोलीस नाईक महाडेश्वर, मांडरे, खुरपे, पोलीस शिपाई राठोड, सौदाणे, पोलीस शिपाई केंद्रे, पोलीस हवालदार चालक पवार, पोलीस नाईक राणे पोलीस शिपाई निमगिरे यांनी पार पाडली गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक दादा गायकवाड करीत आहेत.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week