नार्कोटिक्स विभागाची उल्लेखनीय कामगिरी, ५१३-किलो मेफेड्रोन पकडला !!

नार्कोटिक्स विभागाची उल्लेखनीय कामगिरी, ५१३-किलो मेफेड्रोन पकडला !!

       हल्ली अंमली पदार्थाचे वाढते सेवन, तरुण पीढी व समाजाला वाळवी सारखे लागले आहे. आये दिन रोज कुठेतरी अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीवर धाड सत्र सुरू आहे आणि अमली पदार्थाचे मुळापासून समूळ नाश होण्यासाठी मुंबई नार्कोटिक्स विभाग कार्यरत आहे. अशीच एक उल्लेखनीय कामगिरी मुंबई अंमली विरोधी कक्ष वरळी युनिट मुंबई यांनी पार केली.

        दिनांक २९/३/२२ रोजी वरिष्ठांच्या सुचने नुसार अमली विरोधी विशेष मोहिमे अंतर्गत वरळी युनिटचे पथक अमली पदार्थ  खरेदी विक्री करणारे पुरवठा, साठा करणारे इसमाच्या गस्ती दरम्यान शोध घेत असताना शिवाजीनगर गोवंडी, मुंबई येथे संषयीत आरोपी यांच्या कडून २५० ग्रॅम, दुसरा आरोपी ह्याच्या कडुन २ किलो ७६०ग्रॅम वजनाचा एम डी (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आला. नमूद गुन्ह्याच्या तपासात आरोपी तिसरा व चौथा यांच्याकडे केलेल्या तपासात पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली. अटक केलेल्या पाचव्या आरोपी कडुन एकूण ७१० किलो पेक्षा अधिक वजनाचा एम डी मेफेड्रॉन सदृश्य अंमली पदार्थ अंदाजे १४०३ कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे. या आधी तपासामध्ये मेफेड्रोन हा सदृश्य अमली पदार्थ अंदाजे किंमत १४०८ कोटी रुपये इतका माल जप्त करण्यात आला.

        सदर गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये पाचवा आरोपी याने गुजरात राज्यात भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर तालूक्यात एका कँपनीत हा अमली पदार्थ बनविल्याचे निष्पन्न झाले. पाचव्या आरोपीने पानोली अंकलेश्वर राज्यात एका कंपनीत बनवलेला ५१३ किलो पेक्षा जास्त मेफेड्रॉन तयार करण्याच्या  प्रक्रिये मधील ८१२ किलो पेक्षा अधिक वजनाची सफेद रंगाची पावडर व ३९७ किलो पेक्षा अधिक वजनाचे तपकिरी रंगाचे खडे  रासायनिक कारखान्यातून जप्त करण्यात आले. पोलीस पथकाने अमली पदार्थ निर्मिती व अवैध रित्या व्यापार करणारे मोठे रॅकेट पकडले.

        ह्यात एकूण ७ आरोपी असून ६ पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. (1) समसुल्ला अब्दुल्ला खान वय ३८ वर्ष (२) अयुब इझार अहमद शेख वय ३३ वर्ष (३) रेश्मा संजय कुमार चंदन वय वर्ष ४९ (४) रियाज अब्दुल सत्तार मेमन वय वर्ष ४३ (५) प्रेम प्रकाश पारसनाथ सिंग वय ५२ वर्ष व (६) गिरीराज दीक्षित यांना अटक करण्यात आली आहे.

        सदरची यशस्वी कामगिरी मा पोलीस आयुक्त विवेक फंनसळकर, पोलीस सह आयुक्त गुन्हे डॉ सुहास वारके, अपर पोलीस आयुक्त गुन्हे विरेश प्रभू, पोलीस उप आयुक्त  दत्ता नलावडे, सहा पोलीस आयुक्त सावळा राम आगावणे अंमली पदार्थ विरोधी कक्ष मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक वरळी युनिट चे प्रभारी पोलीस नि संदिप काळे, आझाद मैदान युनिटचे  प्रभारी राजेंद्र दहीफळे, ब वरळी युनिटचे स पो नि  संतोष साळुंखे, बांद्रा युनिटचे स पो नि सुरेश भोये, वरळी युनिटचे स पो नि अमोल कदम, पोलीस उप नि रवींद्र सावंत, पोलीस उप नि शैलेश देसाई, सा. फौजदार सुरेश साळुंखे, पोलीस हवालदार सुदेश साळुंखे, पो नाईक राजू तडवी, पो ना हरिश राठोड,  राजदीप दळवी, प्रीतम ढोरे, नितीन जाधव, शेलार, हणमंत येडगे, महेश गायकवाड,  पोलीस शिपाई आकाश, हनुमंत जाधव यांनी यशस्वी केली. पुढील गुन्ह्याचा तपास स पो नि अमोल कदम करीत आहेत.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week