गझल दिवसाच्या प्रत्येक ......

गझल दिवसाच्या प्रत्येक ......

    दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे

   व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे

   तू हसता फुलतात जिवाच्या लाख कळ्या       देहाच्या प्रत्येक सणावर नाव तुझे

  जाताना तू शपथ दिली ना रडण्याची           डोळ्यातील या गर्द घनावर नाव तुझे

  तू जाता इतुकेच कळाले जगताना

   हृदयाच्या प्रत्येक व्रणावर नाव तुझे

   तू नसताना हे जगणे कसले जगणे

  या जगण्यावर या मरणावर नाव तुझे

वृत्त  माल्यश्री

प्रीती तिवारी


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी