प्रियसी !!

प्रियसी असते त्याच्या

कच खाल्लेल्या एकांताची सोबती

थकलो म्हणून खांदे झुकवून बसलेल्या 

आडोश्याची सोबती

त्याच्या उत्कट क्षणातील 

अंधाराची सोबती 

तिला नसतो अधिकार उजेडात येण्याचा

कारण ती प्रियसी असते

प्रियसी फक्त प्रियसीच असते

तिला समाज मान्य बायको होता येत नाही

कारण

ते त्याच प्रेम असत कुटुंबाची ईच्छा नाही

तिला दिलेल्या वचनाला साक्षीदार असतात

चार भिंती आणि घडयाळाची टिकटिक

तरीही ती पाळते त्याला दिलेला प्रत्येक शब्द

म्हणून तर पापणीही ओली करत नाही ती

त्याला दुसरीच्या ओंजळीत टाकताना....

प्रियसीला अधिकार असतो 

प्रेम करण्याचा

प्रियसीला अधिकार नसतो

सोबतीची आशा ठेवण्याचा

प्रियसीला अधिकार असतो

गुंतण्याचा आणि गुंता सोडविण्याचाही

पण तिला अधिकार नसतो

त्याचा हात धरण्याचा...

प्रियसीला 

प्रेम मिळत  तुटक

स्वप्न मिळतात 

भेटवस्तू मिळतात

वचन मिळतात

अश्रू मिळतात

एकटेपणा मिळतो..

प्रियसीला सर्व काही मिळत

फक्त मिळत नाही तर

'तो'" आणि त्याची सोबत"

प्रीती तिवारी


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी