
प्रॉपर्टीसाठी केला मुलाने आईचा खून !!
प्रॉपर्टी चे वाद काही नवीन नाहीत. पूर्वी घर घरात भाऊ भाऊ, नातेवाईक, आईवडील मुलं याचे नेहमीच प्रॉपर्टी वरून वाद होत असतात, कधी कधी माणूस मनात डाव ठेऊन वाद झालेल्या माणसाचा काटा काढायला कमी करीत नसतो, रागाच्या भरात त्या व्यक्तीला जीवठार मारायला ही कमी करीत नाही.
अश्याच एका घटनेची नोंद जुहू पोलिस ठाण्यात झाली. जुहू येथील एका सोसायटीत राहात असलेल्या सिनिअर सिटीझन बिना कपूर ह्या मिसिंग असल्याची तक्रार सोसायटीच्या सिक्युरिटी गार्ड ने जुहू पोलीस स्टेशन येथे नोंदविली त्या अनुषंगाने पोलिसांनी तेथे जाऊन पाहिले असता बिना कपुर ह्या घरात नव्हत्या असे दिसले त्यावरून त्यांची मिसिंग ची तक्रार पोलिसांनी नोंदविलीव त्यांच्या सोबत राहत असलेला त्यांचा मुलगा सचिन कपूर व त्यांचा नोकर ही मिसिंग असल्याचे ही आढळुन आले.
तपास करुन त्याना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या जवळ चौकशी केली असता त्यानी प्रॉपर्टीच्या वादावरून रागाच्या भरात आपली आई बिना कपूर हिचा खून करून प्रेत माथेरान येथे फेकून दिल्याचे कबुल केले. त्याना सोबत घेऊन शोध घेतला असता बिना कपूर याच प्रेत तेथे मिळून आले त्या अनुषंगाने पोलिसांनी दोघाना ताब्यात घेऊन भारतीय दंड विधान ३०२, २०१/३४अनव्ये मर्डर चा गुन्हा दाखल केला आहे.