अंजान से दोस्ती पडी मेहेंगी, प्राणास मुकला मुकबधिर !

अंजान से दोस्ती पडी मेहेंगी, प्राणास मुकला मुकबधिर !

        हल्ली कुणावर विश्वास ठेवणे म्हणजे धोकादायकच कधी काय प्रसंग ओढवेल सांगू शकत नाही. कुणी काही लालचे पोटी काय करतील याचा भरोसा नाही. कधी कधी जीवावरही बेतते, अशीच एक घटना वसईतील नायगाव येथे घडली, वसईतील नायगाव हे तसे सुनसान स्टेशन आहे लोकवस्ती दूर असलेलं, आजूबाजला झाडी आणि आगर, रात्री प्रवासाचा प्रॉब्लेम. वसई नायगावची लोकल, लोकच नायगाव रेल्वे स्टेशनला उतरत असतात.

        दिनांक २० डिसेंबर रोजी सायंकाळी  नायगाव पूर्व वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगाव पूर्व, ऑरनेट लिंक रोड ते स्टार सिटी कडे जाणाऱ्या कच्च्या रोडच्या डाव्याबाजूच्या मोकळ्या जागेत मयत सुनील तिवारी वय वर्ष ३४, राहणार जौनपूर राज्य उत्तर प्रदेश, यास कोणी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून  मारहाण करून, पांढऱ्या उपरण्याने गळा आवळून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यास निर्जन स्थळी टाकले होते.

       सदर बाबत भारतीय दंड विधान ३०२,२०१ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात मयताची ओळख पटली होती, परंतु मयत इसम मूकबधिर  होता. तसेच तो गावाहुन नुकताच आला होता. त्यामुळे त्यास कुणी मारले व का मारले ? याबाबत काही एक उलगडा होत नव्हता. 

       मूकबधिर असलेला इसम हा गावाहून आपल्या भावाच्या घरी नालासोपारा ता. वसई येथे जाण्यासाठी रेल्वेने आला होता. परंतु नालासोपारा येथे जाण्याऐवजी तो नायगाव स्टेशनवर का उतरला. ह्या प्रश्नाचे उत्तर ही मिळत नव्हते अशा संवेदनशील  गुन्ह्याचा कसोशीने तपास करण्याचे आदेश श्री अविनाश अंबुरे पो. उपआयुक्त गुन्हे युनिट २ वसई यांनी दिले होते. त्यांच्या आदेशानुसार अंमलदार अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची बारीक पाहणी करून, तांत्रिक पुरावे हस्तगत करून, साक्षीदारानुसार सखोल तपास करून आरोपी यशवर्धन अशोक झा, वय २१ वर्ष, राहणार रूम नो. डी/१०४ , जूचंद्र, नायगाव (पूर्व) ता. वसई, यांस त्याच्या राहत्या घरातून दिनांक २३ डिसेंबर ०२२ रोजी ताब्यात घेतले. 

       त्याच्याकडे कसोशीने तपास केला असता त्यानेच मयत इसमास लुटण्यासाठी गुन्हा केला आहे हे निष्पन्न झाले. मयत इसम हा नुकताच गावाहुन त्याचे मूळ गाव जौनपूर यूपी येथून रेल्वेने आला होता. तो मूकबधिर असल्यामुळे त्याच्याकडे मोबाईल नव्हता, त्यावेळी त्याने आरोपीस त्याच्याकडील चिठ्ठीवरील मोबाईल नंबरवर संपर्क करून त्याच्या भावास स्टेशनवर बोलवण्याबाबत विनंती केली. त्यावेळी आरोपी यशवर्धन याने मयत सुनिल तिवारी असहाय्यता लक्षात आल्याने त्याने मयत सुनील तिवारी याला लुटण्याचा प्लान तयार केला. त्यानुसार आरोपी याने चिठ्ठीवरील भावाचा फोन बंद असल्याचा बहाणा करून मयत इसम यास फोन संपर्क होताच भावाला बोलावून घेईल असे सांगितले व तोपर्यंत मी जवळच राहवयास असून, बँचलर राहतो, असे सांगून भावाचा फोन चालू होईपर्यंत आपण माझ्या घरी येऊन आराम करावा असा बहाणा करून मयत इसम यास नायगाव पूर्व येथील एका निर्जनस्थळी घेऊन गेला सदर ठिकाणी नेल्यानंतर मयत इसम याचा मुकबधिर असल्याचा व असाह्ययतेचा गैरफायदा घेऊन त्याचे पैसे व साहित्य लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु मयत इसमाने त्यास विरोध केला. त्यामुळे आरोपी यशवर्धन झा याने त्यास दगडाने चेहऱ्यावर गंभीर दुखापत करून मयताच्या खांद्यावरील उपरण्यानेच त्याचा गळा आवळून निर्घृणपणे खून करून मृतदेह जागीच गवतात टाकून पळून गेला होता सदर आरोपी यास पुढील तपासासाठी वालीव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

       सदरची कामगिरी श्री अविनाश अंबुरे, पो उपायुक्त गुन्हे, श्री अमोल मांडवे सा. पो. आयुक्त गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो निरीक्षक श्री राहुल राख, श्री. शाहुराज रणवरे, कक्ष २, सहा पो निरीक्षक दत्तात्रय सरक, सागर शिंदे, अमोल आंबवणे, पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत पोशीरकर, सा पो उप निरीक्षक रमेश भोसले, संजय नवले, संतोष चव्हाण , पो हवालदार मनोहर तावरे, प्रविणराज पवार, राजविर संधु, सतीश जगताप, अनिल नांगरे, असिफ मुल्ला, राजाराम काळे, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, महेश वेल्हे, संग्राम गायकवाड, सुनील कुडवे, जयकुमार राठोड, सचिन पाटील,  दादासाहेब आडके, रमेश आलदार, प्रशांत ठाकूर पो अंमलदार हनुमंत सूर्यवंशी यांनी यशस्वी केली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week