जरा याद आली तरी !!

जरा याद आली तरी !!

एक गझल ... आपके नाम????????


????????????????????????????????????????????????


जरा याद आली तरी येत जा तू 

खबर ना मिळाली तरी येत जा तू 


मनाची कवाडे खुली ठेवतो मी 

कधी बंद झाली तरी येत जा तू 


तशी सांज माझी पुन्हा ना बरसली

तुझी रात न्हाली तरी येत जा तू 


जरी भिन्न झाल्या उद्या याच वाटा

कळवण्या खुशाली तरी येत जा तू


तुझ्या आठवांची पकड घट्ट व्हावी 

हवे तर अकाली तरी येत जा तू 


नको वाटते जर शिवारात फिरणे

अजिंठा- मनाली तरी येत जा तू 


तसा रोज असतो घरी एकटासा

घराभोवताली तरी येत जा तू 


उतरत्या वयाला कसे आवरू मी ?

निसटला सवाली तरी येत जा तू 


निळेशार डोळे तुझे सागरासम

जहाजं बुडाली तरी येत जा तू 


©® - अर्जुन शेवडे इचलकरंजी 



Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी