
पैसा फेको तमाशा देखो.....
पैशाच आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या दलाल आरोपितांना नालासोपारा मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा कडून अटक दोन पीडित महिलांची सुटका !!
इझी मनी मिळविण्यासाठी आजकाल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. रात्री घरी उशिरा घरी परतताना महिलांसोबत अठरा ते पंचवीस वयोगटातल्या मुली सुद्धा सर्रास रस्त्यावर उभ्या असलेल्या दिसतात. गेल्या वर्षी आमच्या बातमीकार चे संपादक श्री, अभिषेक शिंदे व क्राईम रिपोर्टर प्रीती तिवारी यांच्या मार्फत वसई स्टेशन इथे सर्च ऑपरेशन करून बऱ्याच वेश्या महिलांवर कारवाई करण्यात आली होती.
वसई स्टेशन, नालासोपारा, विरार ह्या परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला मुली सर्रास उभ्या असलेल्या दिसतात. रोड वेश्या व्यवसाया बरोबर ह्या परिसरात दलालांन मार्फत छुपा वेश्या व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो.
कधी गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्याना वेश्या व्यवसाय करण्यासही दलाल भाग पाडतात.
अशीच एक घटना नालासोपारा येथे घडली. नालासोपारा विभागात पर प्रांतीय, तडीपार लोकांचा ही खूप भरणा आहे त्यामुळे आये दिन इथं गुन्हे घडत असतात. दिनांक २९ एप्रिल ०२३ रोजी अनैतिक मानवी वाहतूक कक्ष नालासोपारा यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की वेश्या दलाल असलेले नामे १) हरेश्वर केशव राऊत २) गुंडम्मा रानप्पा भांगी उर्फ राजश्री हे महिलांना पैशाचे आमिष दाखवुन वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून वेश्यागमनाकरीता महिलांना पुरवितात व त्या बदल्यात पुरुष गिऱ्हाकांकडून मोबदला घेतात.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अनैतिक वाहतुक कक्ष नालासोपराचे प्रभारी अधिकारी श्री. संतोष चौधरी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून पोलीस स्टाफ, बोगस गिऱ्हाईक व पंचासोबत पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुंगारेश्वर फाटा वसई पूर्व या ठिकाणी छापा मारला व आरोपी हरेश्वर केशव राऊत, रा.चिखल डोंगरी विरार (प) २) गुंडम्मा रानप्पा भांगी उर्फ राजश्री, रा. अंधेरी, मुंबई यास ताब्यात घेऊन त्यांच्या गुन्ह्यात वापरलेली रिक्षासह एकूण ०१,०२,६५० रु. इतका माल हस्तगत करून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.
सदर बाबत पोलीस हवालदार बापू पवार यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरून पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क्र. ३०८/२०२३ भारतीय दंड विधान कलम ३७०(१) (३) ३४ सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई श्री. अविनाश अंबुरे (पोलीस उप आयुक्त गुन्हे), श्री. अमोल मांडवे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा युनिट चे प्रभारी अधिकारी श्री संतोष चौधरी, पोलीस हवालदार बापू पवार, राजेश पदमने, महेंद्र पुंडलिक शेटे, रोशन नारायण किणी, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, चालक पो. हवालदार सुनील विष्णू पागी, महिला पोलीस अंमलदार भोर नेम भरोसा सेल यांनी यशस्वी पार केली.