फसवून डायमंड चोरी करणारे !!

फसवून डायमंड चोरी करणारे !!

    काचेचे तुकडे व खोटे डायमंड ठेऊन १ करोड १८लाखाचे डायमंड केले लंपास !    

      डायमंड म्हटलं की सगळ्यांचे डोळे चमकतात. हिऱ्याच वेड प्रत्येक स्त्री, पुरुषाला असते. सोन्यापेक्षाही मौल्यवान असलेलं हिऱ्याचा एक तरी, सेट अथवा लॉकेट असावं असं प्रत्येकांच्या मनात असते. असे ह्या चमकमणाऱ्या हिऱ्याचे चोर ही फार असतात. काही हिरेतर इतके मौल्यवान असतात की एक एक हिऱ्याची किंमत ही लाखांच्या घरात असते. असे हे मौल्यवान हिऱ्यांची चोरी करणारे ठग काल मुंबई पोलिसांनी पकडले.

              मुंबईत सामान्य माणसाबरोबर उच्चभ्रू लोकही राहतात, आणि ते सोन्या पेक्षा हिऱ्याची खरेदी करतात. सोने हिऱ्याचे व्यापारी बऱ्याचदा मारवाडी असतात. घटना अशी घडली की दिनांक १८ मार्च रोजी  महिधरपूर, पोलीस ठाणे, गुजरात येथे  हिऱ्याचे व्यापारी असलेले धर्मेश बाबुभाई पवाशिया, वय वर्ष ३१वर्ष रा ठिकाण  महिधरपुरा सुरत, गुजरात यानी फिर्याद नोंदवली की दिनांक १८ मार्च ०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन अनोळखी इसम फिर्यादी धर्मेश पवाशिया यांच्या दुकानात येऊन त्यांना डायमंड खरेदी करावयाचे असल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी आलेल्या इसमांना त्यांच्या कडील डायमंड दाखवले असता यातील इसमानी फिर्यादी यांना बोलण्यामध्ये व्यस्त ठेवले . तसेच एका इसमाने जाणून बुजून चहा सांडल्याचा बहाणा करून फिर्यादी यांचे लक्ष विचलित केले व दुसऱ्या इसमाने खऱ्या डायमंडच्या ठिकाणी खोटे डायमंड व काचेचे तुकडे ठेऊन एकूण १ करोड १८ लाख इतक्या किमतीचे डायमंड घेऊन पसार झाले. 

              म्हणून महिधरपुरा पोलीस ठाणे , गुजरात गुन्हा रजि क्र.१६५/२०२३, कलम ४२० (ब),११४ भारतीय दंड विधान अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता नमूद गुन्ह्यातील इसमांबाबत गुजरात पोलिसांकडून माहिती मिळताच गोपनीय बातमीदार तसेच तंत्तिक तपास करून माहिती प्राप्त झाल्यानंतर ७ तासाच्या आत त्यांचा शोध घेण्यात आला. सदर इसम हे सुरत वरून चोरी करून पसार झाले होते. ते मुंबईच्या कांदिवली व लालबाग परिसरात मिळून आले. त्याना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, नमूद गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी इसमाना गुन्ह्याच्या पुढील तपासाच्या अनुषंगाने त्यांना सुरत गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक जे.एन.झाला व पथक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

            सदरची यशस्वी कामगिरी मा.पोलीस आयुक्त विवेक फंनसळकर, मा.विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, मा.सह पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा.उप आयुक्त (प्रकटीकरण), प्रशांत कदम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डी विशेष), श्री. चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा मुंबईचे प्रभारी गावड, पोलीस शिपाई योगेश उथळे यांनी उत्कृष्ठपणे पार पाडली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week