अतिरेकी आले!!!

       मुंबई स्वप्ननगरी देशातील प्रत्येक राज्यातील लोक मुंबई मध्ये आहेत. भारताची आर्थिक राजधानी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेली मुंबई महानगर पालिका. मुंबादेवीच्या नावाने जगभरातील लोकांना मुंबापुरी पाहण्याची स्वप्न असतात.

        मुंबापुरीत मोठ्ठ्या हॉटेल्स पासून, रस्त्यावर वडा पाव विकून, पोटभरणारे आहेत. तसेच मोठमोठ्या कंपन्यांची ऑफिस, सरकारी ऑफिस, बॅंकाही आहेत, मोठमोठे जगप्रसिद्ध बिजनेस मन, बॉलिवूड चे सितारे ही मुबंईत राहतात. समुद्र किनारी वसलेली ही मुंबापुरी एकदातरी डोळ्याने पाहावी, म्हणून देशातून, तसेच जगभरातून पर्यटक जीवाची मुंबई करण्यासाठी इथं येत असतात. 

            कितीतरी वेळा अतिरेकी हमला, बॉम्ब स्फोटातून मुंबईवर आघात करण्यात आला. परंतु ह्या सर्वातून मुबंईकर सावरले आहेत. मुंबई पोलिसही त्यांच्या कार्य तत्परतेमुळे जगात प्रसिद्ध आहेत. परंतु   मुंबई शहरात असलेल्या शांततेत कस विघ्न आणायचं हे काही समाजकंटक पाहत असतात. 

          दिनांक ७ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास एका मोबाईल वरून, मुंबईचे मुख्य नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६२१८५५५ यावर कॉलर याने स्वतःचे नाव राजा ठोंगे असल्याचे सांगून माहिती दिली की, मुंबई येथे पहाटे दुबईहून तीन इसम आले असून ते अतिरेकी असून, त्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे. त्यातील तीन इसमांचा दोन नंबरचा व्यवसाय असून गाडी क्रमांक MH 16 BZ 8032  असल्याचे कळवुन तो पुण्यावरून बोलत असल्याचे सांगितले.

          सदर कॉलच्या अनुषंगाने नमूद मोबाईल क्रमांकाची (नमूद असे लिहलेला मोबाईल क्रमांक आमच्या बातमीकार वृत्तपत्रास प्राप्त झाला नाही) याची नोंद घ्यावी. नमूद मोबाईल क्रमांक ता. आष्टी, बीड येथील इसमाच्या नावाने नोंदणीकृत असल्याचे दिसून आले. यास्तव त्यांच्याकडे चौकशी केली असता. त्यांनी या नंबरचे कोणतेही सिमकार्ड खरेदी केलेले नाही, तसेच ते कॉलर इसमास व इतर संशयीतांना ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच कॉलर ने स्वतःची ओळख लपविण्यासाठी मोबाईल बंद करून टाकला.

          सदर प्रकरणी प्राथमिक चौकशी अंती सदरचा हा कॉल खोटा असल्याचे निष्पन्न झाले असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा अफवांवर विश्वास न ठेवता , शांतता ठेवावी.

          असे आवाहन मुंबई पोलीस मुख्य नियंत्रणालय कक्ष यांनी बातमीकार ऑनलाइन वृत्तपत्र यांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

          नमूद प्रकरणी खोटे नाव सांगून, खोटी माहिती देणाऱ्या अज्ञात आरोपी याचे विरोधात आझाद मैदान पोलीस ठाणे, मुंबई येथे भारतीय दंड विधान गुन्हा नोंद क्र.७९/२०२३ कलम ५०५(१), ५०५(२),१८२ गुन्हा दाखल झाला आहे.

          (प्रशांत कदम.)

          पोलीस उप आयुक्त(प्रकटीकरण),

          गुन्हे शाखा मुंबई.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week