अरे रुक ना !

अरे रुक ना !

   थोडी देर रुक जा, कोई तो बकरा आएगाच तू देख ले ,आज आपुन खाली हाथ घर पे जाएगा नई.

     धानीव बाग तलावा समोर हिताची ए टी एम सेंटर जवळ असलेल्या टपरीजवळ थांबलेले दोन इसम एकमेकात चर्चा करत होते. दरम्यान संध्याकाळी सहाच्या सुमारास रोहित रामानंद राॕय पैसे काढण्यासाठी हिताची ए टी एम जवळ आला तसे हे दोन इसम त्याच्या मागेच ए टी एम च्या कॕबीन मध्ये शिरले ,ए भाय! जरा देख ले भिडू यहाँ रोकडा निकालने में दिक्कत हो रैली है, मेरा कारड (कार्ड) चल नही रहा तेरा बता भिडू देख लेते है चलता है क्या असं बोलून आणि बोलण्यात संमोहित करून शिताफीने कार्ड ची अदलाबदल करून रोहित ची फसवणूक केली आणि रू. 44000/- काढले. रोहितला या सराईत पणाचा थांग पत्ता ही लागू दिला नाही !  नंतर पून्हा एका सभ्य गृहस्थाची फसवणूक अश्याच प्रकारे करून रु.१९०००/- ला गंडविले, आणि तेथून पोबारा केला .

        थोड्याच वेळात रोहितच्या मोबाईल वर पैसे विड्राॕल झाल्याचा मेसेज आला. आणि आपली फसवणूक झाल्याचे त्याला लक्षात आले. रोहित रामानंद राॕय वय वर्ष १९ शिक्षण घेणारा सामान्य मुलगा धानीवबाग नालासोपारा पूर्व तालुका वसई इथे रहाणारा होता .

        फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पेल्हार पोलिस ठाणे गाठले आणि गुन्हा रजिष्टर क्रमांक २८८/२०२३ भारतीय दंड विधान संहिता कलम ४२०,३४ नुसार रितसर गुन्हा नोंदविला .

      मिरा-भाईंदर , वसई-विरार पोलिस आयुक्तालयात ए टी एम मधून पैसे काढून देण्याच्या मदतीचा बहाणा करून हातचलाखी ने पैश्याला गंडविल्याचे प्रमाण अलिकडे खूपच वाढलेले होते. रितसर कायदेशीर पध्दतीने गुन्हा नोंदाविल्या नंतर सदरिल गुन्ह्याचा तपास पो. नि. श्री प्रमोद बडाख आणि संपूर्ण स्टाफ गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांचेकडे सोपविण्यात आला. अरे प्रताप किधर है रे तू?  बहोत दीन बीत गए आजकल तू इधर आता ही नही रे, मुझे मिलना है तुझे । तू पोलिस थाना पे आ जा, गुप्त बातमीकार प्रताप यास फोनवर बडाख सरांचे बोलणे झाले. घर पर ही है ना सहाब आपुन किधर कू जाएगा? और सुनो मै मेरी बच्ची कू ट्यूशन से घर पर लाएगा फिर तुमकू मिल लेगा प्रताप बडाख सरांना बोलला, प्रताप बडाख सरांसमोर बसलेला होता . सर ए टी एम च्या गुन्हा बद्दल प्रताप ला बोलत होते क्या तुझे मालूम है ? की यह वारदात कोण कर रहा है ? प्रतापला सर विचारत होते .

अरे छोडो ना सहाब, काई कू इस झमेले में आपुन को ले रहा है,

इस में भौत रिस्क रहता है हमारे जान पे आ बनती है । 

ये चोट्टा लोग हमारा खामोखाम गेम बजा डालेगा, अपून को इस झमेले में फँसने का नईच प्रताप ने हात झटकले आणि वापस जाण्याचे प्रयत्न करत होता, तितक्यात बडाख सर बोलले. अरे सुन. हेड क्वार्टर से तेरा पेमेंट आया है, वह तेरा पहला हिसाब चुकता कर ले।

      असे बोलून प्रताप चे ९०००/-रू. मानधन देऊ केले. तसा प्रताप नरमला आणि बोलला दो दिन का मुहलत देने को माँगता है. आपुन ए टी एम का लफडा खोलेगा प्रताप बोलला आणि तेथून घरी निघाला. दोन दिवसानंतर संध्याकाळी प्रताप चा सरांना फोन आला .

      सहाब मालूम पडा है की, ऐसी ठगी दो लोग करता है, एक जो है जिसका नाम साहिल सलीम शेख है जो अन्टाॕप हिल बंबई का है और दुसरा जो है जिसका नाम सागर अभिजित मंडल है ! और वो बांद्रा पूर्व बंबई में रहता है। लेकिन सहाब आपुन का नाम उपर आने को नई मँगता है। पैलेच बोलरैला है आपुन. प्रताप नी खबर दिली. गुप्त बातमी देणाऱ्या च्या सुचनेवरून आरोपी साहिल शेख आणि सागर मंडलला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविल्या नंतर त्यांनी गुन्हा कबूल केला. त्या दोन्ही गुन्हेगारांना दि. ४. ४.२०२३ रोजी अटक झाली. आरोपीनी गुन्ह्यात वापरलेली 'बर्गमॕन' मोटार सायकल आणि फसवणूकीतून जमवलेले रु. १,५०,०००/- हस्तगत करण्यात आले आणि पुढे चौकशी कली असता त्यांचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले.

१) पेल्हार पोलिस ठाणे

गुन्हा रजि. क्र.२८८/०२३ भा.द. वि. संहिता कलम ४२०/३४

२) पेल्हार पोलिस ठाणे

गुन्हा रजि. क्र. ३०३/०२३भा.द. वि. सं. कलम ४२०/ ३४

३) पेल्हार पोलिस ठाणे गुन्हा रजि. क्र. ७७/२९२३/भा. द. वि सं कलम ४२०,३४

४) तुळीज पोलिस ठाणे

गुन्हा रजि. क्र. २१०२९२३ भा.द. वि .सं कलम ४२०/३४

५) शांतीनगर पोलिस ठाणे 

     (ठाणे शहर) गुन्हा रजि. क्र. २५६/२०२३ भा द वि सं कलम ४२०,

६) लालपूर/पांण्डेयपूर पो. ठाणे (उत्तर प्रदेश जि. वरूणा) गुन्हा रजि. क्र ६६/०२२३ भा. द. वि. सं. कलम ४२०,४०६ अशा प्रकारचे ते गुन्हे होते.

    अटक आरोपीच्या विरूद्ध मुंबई शहर पोलिस आयुक्तालय कार्य क्षेत्रात अंधेरी, भायखळा, डी एन नगर, साकीनाका मालवणी या पोलिस ठाण्यात एकूण बारा गुन्ह्याची नोंद असल्याचे निष्पन्न झाले तसेच, ठाणे पोलिस उपायुक्तालय व इकडील पोलिस आयुक्तालय परिसरात असे अनेक गुन्हे केल्याचे आरोपींनी कबूल केले.

        या प्रशंसनिय कामगिरीस श्री अविनाश अंबुटे पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) श्री. अमोल मांडवे सहाय्यक पो.आयुक्त ( गुन्हे ) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष ३ चे पो नि श्री प्रमोद बडाख, पोलिस उप निरक्षक शिवाजी खाडे, उमेश भागवत, पोलिस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सचिन घेरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलिस अमलदार राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे सागर सोनवणे, गणेश यादव तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण (सायबर गुन्हे शाखा) यांनी पार पाडली .

प्रद्युम्न देशपांडे .

जालना


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week