
मीरारोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांड !!
मीरारोड येथील सरस्वती वैद्य हिच्या हत्याकांड प्रकरणात नया नगर पोलीस ठाणे यांनी बाराशे पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले आहे. आरोपी मनोज साने याने विष पाजून त्याची लिव्ह पार्टनर सरस्वती वैद्य हिची हत्या केली होती. त्यानंतर तिच्या देहाचे करवतीने असंख्य तुकडे करून कुकरमध्ये शिजवले होते. यानंतर पोलिसांनी ६२ साक्षीदार तपासले आहेत.
मीरा रोड येथील मनोज साने वय वर्ष ५६ हा सरस्वती वैद्य वय वर्ष ३२ तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत होता. तीन जून रोजी सरस्वती वैद्य हीची हत्या करून त्याने तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून कुकरमध्ये शिजवले होते. हाडे आणि मास वेगळे करण्यासाठी तो कुकरमध्ये शिजवत होता. पोलिसांना घरात असंख्य तुकडे सापडले. तीन पातेले, कुकर आणि दोन बादल्या भरून होते. शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. नया नगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मनोज साने याला अटक केली होती.
घटनास्थळावरूनच पुरावे सापडले असले तरी आरोप सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय आणि न्याय वैद्यकीय असंख्य चाचण्या कराव्या लागल्या होत्या. मनोज साने. पोलिसांची दिशाभूल करत होता. मृतदेहाचे असंख्य तुकडे करून शिजवले असल्याने वैद्यकीय पुरावे मिळणे पोलिसांना आव्हानात्मक बनले होते. अखेर पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोप पत्र चार्जशीट न्यायालयात सादर केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल बाराशे पानांचे दोषारोप पत्र तयार केले असून ठाणे सत्र न्यायालयात सादर केले आहे. यामध्ये एकूण 68 जणांचे जवाब नोंदविण्यात आले आहेत. त्यात विष कटर प्लास्टिक ज्या दुकानातून घेतले होते त्या दुकानदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आरोपी म्हणून साने यायचे सहा महिन्यापासून सरस्वती साने हिच्याशी भांडण सुरू होते.
त्यामुळे मनोज साने याने सरस्वती वैद्य हिला मारण्याची योजना बनवली होती. त्याने सरस्वती वैद्य हिला ताकामधून विष दिले होते. त्यानंतर मृतदेहाचे असंख्य तुकडे करून विल्हेवाट लावली असे या दोषारोप पत्रात म्हटले आहे. हत्या केल्यानंतर मनोज यांने मृतदेहा सोबत पस्तीस छायाचित्र काढली होती. त्याचा मोबाईल न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवून पोलिसांनी ती छायाचित्रे पुन्हा मिळवली आहेत असे सांगण्यात आले.