जिवंत काडतुसे व मॅगझीन पोलिसांनी केली हस्तगत !!

जिवंत काडतुसे व मॅगझीन पोलिसांनी केली हस्तगत !!

          मुंबई यलोगेट पोलीस ठाणे यांनी २४ तासाच्या आत जिवंत काडतुसे व मॅगझिन हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली.

         दिनांक ८/९/२०२३ रोजी फिर्यादी हे मुंबई पोर्ट प्राधिकरण व पी. डीमेलो रोड मुंबई अंतर्गत यलोगेट प्रवेशद्वार या ठिकाणी रात्रपाळी करीत असताना दिनांक ९/९/०२३ रोजी रात्री १.५५ वा पी. डीमेलो रोड कडून एक ग्रे सिल्वर रंगाची कार भरधाव वेगाने मुंबई प्राधिकरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात आत आली. सदर कार चालकास तेथे ड्युटीवर असलेल्या सी. आय. एस. एफ च्या जवानांनी कार थांबविण्याचा इशारा केला असता, वाहन चालकांनी वाहन न थांबवता, पुन्हा भरधाव वेगाने गेटच्या बाहेर जाण्याकरता वाहन रिव्हर्स घेतले, फिर्यादी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना, त्यांच्या ताब्यातील इसान्स रायफल ची मॅगझिन कार मध्ये पडली.

         परंतु तरी देखील वाहन न थांबविता कार भरधाव वेगाने निघून गेली. म्हणून येलो गेट पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२/०२३ कलम २७९, ३३६, ४०३ भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

         वरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुशांत सावंत व गुन्हे प्रकटीकरण यांनी केलेला असून घटनास्थळी प्राप्त केलेल्या फुटेज वरून वाहनाची MH01 -CD ही सिरीज व त्याचा मेक swift Desire असल्याचे निष्पन्न झाले होते. वाहनाचा क्रमांक मिळवण्या करता सदर वाहन हे ज्या ज्या मार्गाने गेले होते त्या त्या मार्गाचे सी.सी.टीव्ही फुटेज नियंत्रण कक्षाकडून प्राप्त केले गेले, परंतु कोणत्याही फुटेज मध्ये वाहनाचा नंबर दिसून आला नाही. दुसरा पर्याय म्हणून राज्य परिवहन विभागातील वरिष्ठांशी संपर्क साधून MH01-CD swift Desire या सर्व मॉडेलची यादी प्राप्त करून घेतली. अशा एकूण ८६ वाहनांचे भौगोलिक विश्लेषण तसेच प्राप्त झालेल्या सी.सी.टीव्ही फुटेजचा तांत्रिक अभ्यास करून वाहनाच्या शेवटच्या लोकेशन पर्यंतचा मागवा घेऊन गुन्ह्यात वापरलेले वाहन व तीन आरोपी नामे १) गौरेश मोहित वगळ २७ वर्ष २) श्रेयस किरण सुरी २५ वर्ष ३) अभिषेक अजित माणगावकर वय २४ वर्ष यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या सखोल तपासात त्यांच्या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न करून गुन्ह्यातील खालील संपूर्ण मालमत्ता, हस्तगत करण्यात आली आहे.

            हस्तगत मालमत्तेचे वर्णन

         एक अंदाजे ५ इंच लांबीची व २.५ इंच रुंदीची फायबर बॉडी असलेली पारदर्शक मॅगझिन व त्यामधील ५.५६ व्यास असलेली INSAS ही रायफल व २० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

         वापरलेले स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक MH01-CD 1766  किंमत ३,००,००० हे देखील हस्तगत करण्यात आले.

         सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री सत्यनारायण चौधरी, माननीय पोलीस अप्पर आयुक्त द. प्रा. विभाग श्री. डॉ. अभिनव देशमुख, माननीय पोलीस उपायुक्त, बंदर परिमंडळ श्री. संजय लाटकर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त / येलो गेट विभाग श्रीमती माया मोरे, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सरला वसावे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सुशांत सावंत, पोलीस हवालदार क्र. ०३४६३ सुनील वारीक, पोलीस हवालदार क्रमांक ०३०८४० किरण घाग आणि पोलीस शिपाई क्रमांक ०७११५७ स्वप्निल तेली यांनी केली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week