
२५८ ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) केला हस्तगत मुंबई अंमली विरोधी कक्षाची उल्लेखनीय कामगिरी !!
२५८ ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) केला हस्तगत मुंबई अंमली विरोधी कक्षाची उल्लेखनीय कामगिरी !!
दिनांक २७/१०/२०२३ गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी कक्ष आझाद मैदान युनिटच्या पथकाने, कुरेशी नगर कुर्ला पूर्व परिसर येथे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करीत असताना एक इसम अंमली पदार्थ एमडी (मेफेड्रोन) सह मिळून आला. त्याच्याकडे मिळालेल्या एमडी (मेफेड्रोन) बद्दल तपास करीत असताना, त्याने त्याच्याकडील एमडी डोंगरी परिसर मुंबई येथून घेतल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या जबाबारून नूरबाग जंक्शन डोंगरी मुंबई, येथे तपास करताना दुसरा इसम देखील अंमली पदार्थसह मिळून आला. त्या इसमांच्या ताब्यातून एकूण २५८ ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) व एक एक्टिवा स्कुटी मिळून आली. अंदाजे ५२ लाखापेक्षा जास्त एमडी (मेफेड्रोन) त्या दोन्हीं इसमांकडे सापडला.
त्या दोन्ही इसमां विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कक्ष आझाद मैदान युनिट मुंबई यांनी कलम ८(क) सह २२(क) २९ एन डी पी एस अँक्ट १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. व इतर कायद्या अन्वये इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
कांदिवली युनिटच्या अमलीपदार्थ विरोधी कक्षाने दिनांक २८/ १०/२०२३ रोजी मुंबई मस्जिद बंदर परिसरात छापा टाकला असता, दोन इसम अंमली पदार्थाची तस्करी करताना मिळुन आले. त्यांच्या जवळून ८५ ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) अंदाजे किंमत १७ लाखापेक्षा जास्त किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
त्यांच्या विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कक्ष कांदिवली युनिट यांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ९०/२९२४ कलम ८(क), सह २२(क) एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ सह गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी कक्ष मुंबई यांनी मुंबईमध्ये विविध ठिकाणी अमली पदार्थ कारवाई विरोधी करत छापे टाकले आहेत. छापेमारीत अमली पदार्थाची तस्करी करणारे चार इसमांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातील एकूण ३४३ ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सन २०२३ मध्ये अंमली पदार्थ विरोधात एकूण ९० गुन्हे दाखल करून १८० अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण ४० कोटी पेक्षा जास्त किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात यश मिळाले आहे. एमडी (मेफड्रोन) या अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यां विरुद्ध एकूण ६० गुन्हे दाखल करीत एकूण १२१ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे व त्यांच्या ताब्यातून अंदाजे २८ कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
अशी उल्लेखनीय यशस्वी कामगिरी श्री विवेक फणसळकर पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, श्री देवेन भारती विशेष पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, श्री लखमी गौतम सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे), श्री शशी कुमार मीना अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री प्रकाश जाधव पोलीस उपआयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा मुंबई व श्री काशिनाथ चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त अमली पदार्थ विरोधी कक्ष मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली, अमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा मुंबई अंतर्गत आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र दहिफळे, व कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री बेले यांच्या नेतृत्वात केली.