नालासोपारात महिलेची गळा चिरून हत्या !!

नालासोपारात महिलेची गळा चिरून हत्या !!

      नागीनदास पाडा नालासोपारा पूर्व येथे बंद घरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. गळा चिरून तिची हत्या करण्यात आली आहे. तिच्या फरार साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. नालासोपारा पूर्व येथील नागीनदास पाडा येथील दत्तानगर चाळीच्या मागे शुक्रवारी दुपारी दुर्गंधी येत होती. पोलिसांना पाचारण केले असता, घरामध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. शितल सावंत (२९) वर्ष असे या मयत महिलेचे नाव आहे.

        फेब्रुवारी महिन्यात पासून ती आपल्या जोडीदारासोबत लिव्हइन रिलेशन मध्ये राहत होती. चार ते पाच दिवसांपूर्वी तिची हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. जोडीदाराने तिचे पायही कापल्याचे आढळून आले.आहे. तिच्या सोबत राहणाऱ्या जोडीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week