
बनावट फेविक्विक !!
प्युओरिटीची गॅरंटी ! मुश्किल होऊन बसलेल आहे असली कोणता आणि बनावट कोणतं ? हे काही कळेनास झाले आहे. विक्रेता गिऱ्हाईकाच्या गळ्यात ब्रॅण्डेड चीज म्हणून कितीतरी बनावट चीज, वस्तू गळ्यात मारत असतात किंवा भाजीवाले सुद्धा गावठी भाजी सांगून गिऱ्हाईकाला फसवत असतात. त्यामुळे आता खरेदी कोणत्या दुकानातून करावी आणि कोणत्या दुकानातून करू नये हा मोठा प्रश्न पडतो ! कोणत्या दुकानात असली ब्रँडेड वस्तू मिळेल आणि कोणत्या दुकानात बनावट वस्तू विकली जाईल याचा काही नेम नाही. हे कदाचित दुकानदाराला हे माहिती असू शकतं स्वतःचा नफा करून घेण्यासाठी तो अशी काही बनावट वस्तू फसव्या कंपनीचा माल खरेदी करून अथवा एखाद्या नामांकित कंपनीचं लेबल लावून विकत असू शकतो !
अशाच एका डुब्लिकेट तयार करणाऱ्या कंपनीचा पडदा फाश मुंबई पोलिसांनी केला. दिनांक ३०/१०/२३ रोजी गुन्हे शाखा (कक्ष १) मुंबई यांना एक गोपनीय माहिती मिळाली की साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम पिडिलाइट कंपनीचा फेविक्विक या मान्यताप्राप्त व नामांकित कंपनीच्या हुबेहू नकल व रंगसंगती करून स्वामित्व हक्काचे उल्लंघन करून फेविक्विक ची विक्री करण्यासाठी साठा करून ठेवलेला होता .
नमूद गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक ३०/ १०/२०२३ रोजी कंपनीचे प्राधिकार प्राप्त अधिकारी आणि गुन्हे शाखा कक्ष १० मुंबई, येथील कक्षाने कुर्ला पश्चिम मुंबई येथे छापा टाकला असता, तेथे पिढीलाईट इंडस्ट्रीज लिमिटेड फेविक्विक या कंपनीचे बनावट फेविक्विक तयार केलेल्याचा साठा, तसेच सदरचे बनावट फेविक्विक तयार करण्याकरीता दोन मशीन, हे सर्व साहित्य मिळून आले. पोलिसांनी सदरच्या दिसत्या परिस्थितीचा पंचनामा करून, रुपये १०,२९,५००/- किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर प्रकरणी आरोपी हनुमान प्रकाश गुप्ता वय ५४ वर्ष, राहणार ठिकाण कुर्ला पश्चिम, मुंबई ह्यास ताब्यात घेण्यात आले असून सदर प्रकरणी गुन्हा प्रकटीकरण शाखा गुन्हा नोंदणी क्रमांक ६७/२०२३ साकीनाका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १०३०/२०२३ कलम ४२०, ४८६, ४८८, कलम ५१ कॉपीराईट अक्ट १९५७ अन्वये गुन्हा नोंद करून त्या त्वरित अटक केली आहे.
अटक आरोपी हनुमान प्रकाश गुप्ता याचे विरुद्ध यापूर्वी घाटकोपर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर बृहन्मुंबई, माननीय विशेष पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, माननीय पोलीस सह आयुक्त गुन्हे श्री लखमी गौतम, माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शशी कुमार मीना, माननीय पोलीस उपायुक्त प्रकटीकरण १, गुन्हे शाखा श्री राज तिलक रोशन, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डी पश्चिम श्री महेश रौशन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष १० मरोळ मुंबई येथील प्रभारी पोलीस निरीक्षक श्री दीपक सावंत, पोलीस निरीक्षक श्री उत्तम भजनावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री धनराज चौधरी, श्री गणेश तोडकर, पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार दिलीप माने, पोलीस हवालदार रामकिसन मोरे, पोलीस हवालदार अविनाश विकणे, पोलीस हवालदार दिग्विजय पांनसरे, पोलीस शिपाई चंद्रशेखर डफणे यांनी यशस्वी केले.