
नकली डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात !!
मुंबई, शिवाजीनगर गोवंडी परिसरात वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी संपादित न करता किंवा वैद्यकीय क्षेत्रातली कोणतीही पदवी अथवा शिक्षण नसताना नागरिकांवर वैद्यकीय उपचार करून त्यांचे आरोग्य धोक्यात टाकून, भरमसाठ फी घेऊन, नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरला मुंबई गुन्हे शाखेने माहिती मिळताच अटक केली.
माहिती प्राप्त झाल्यावर कक्ष सहा कार्यालयीन पोलीस हे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका एम वॉर्ड पूर्व यांनी देवनार शिवाजीनगर मुंबई परिसरातील क्लिनिक वर छापा टाकला असता तेथे बोगस डॉक्टर अल्ताफ हुसेन मोहम्मद निजाम खान वय ५० हा रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करताना मिळून आला.
नमूद डॉक्टरांकडे कोणत्याही वैद्यकीय परवाना नसताना, तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी नसताना, डॉक्टर असल्याचे भासवून बेकायरदेशीररित्या विविध आजारांवरील रुग्णांवर उपचार करताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून स्टेथेस्कोप, वेगवेगळे इंजेक्शन बॉटल्स सिरींज, अँटोबायोटिक टेबलेट्स अशी वेगवेगळ्या प्रकारची औषध आणि वैद्यकीय साहित्य असे पंचनाम्या अंतर्गत जप्त करून, त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८३/२०२३ सीसीसीटीएसन १०२२/२३ कलम ४१९,४२० भारतीय दंड विधानसभा कलम ३३,३६ सह महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अँक्ट १९६१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस मा. आयुक्त श्री विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, पोलीस सह आयुक्त गुन्हे लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शशी कुमार मीना, पोलीस उपायुक्त प्रकटीकरण शाखा राज तिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी/पूर्व) श्री चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष सहा पोलीस प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, हणमंत ननावरे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुठे, कल्पना माशेरे, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार बेळणेकर, सहाय्यक फौजदार सामंत, फौजदार सकपाळ, कुरडे, पारकर, पोलीस हवालदार चव्हाण, जाधव, शिंदे, पोलीस शिपाई घेरडे, कोळेकर,पोलीस शिपाई अभंग पोलीस शिपाई पवार, पोलीस नामदार कदम, पोलीस शिपाई पाटील यांच्या पथकाने पार पाडली.