लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार !!

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार !!

     भाईंदर पूर्वच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी हा तीस वर्षाचा असून तो मुंबईच्या भांडुप परिसरात राहणारा आहे आरोपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून १८ ते २२ नोव्हेंबरच्या दरम्यान बलात्कार केला या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे सहाय्यक निरीक्षक तुकाराम सुकंडे हे अधिक तपास करीत आहेत.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी