जेष्ठ नागरिक व महिला यांच्यासाठी तक्रार निवारण केंद्राचे आयोजन !!

जेष्ठ नागरिक व महिला यांच्यासाठी तक्रार निवारण केंद्राचे आयोजन !!

       माननीय पोलीस आयुक्त मुंबई व माननीय विशेष पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आदेशान्वये माननीय पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था मुंबई यांच्या ते देखरेखे खाली मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यात तक्रार निवारण्याचे आयोजन दर शनिवारी करण्यात येते. दिनांक 9/12/23 रोजी सर्व पोलीस ठाण्यात महिला व जेष्ठ नागरिक यांच्याकरिता तक्रार निवारण्याचे आयोजन करण्यात आले होते.

        सदर आयोजित तक्रार निवारण दिनाच्या दिवशी दाखल दखलपात्र अदाखलपात्र गुन्ह्यातील फिर्यादी तसेच तक्रार पत्रातील अर्जदार एकूण तेराशे तेवीस तक्रारदार हजर होते त्यापैकी 568 महिला तक्रारदार व 141 जेष्ठ नागरिक तक्रारदार पोलीस ठाण्यात हजर होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी यांच्याकडून त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमात विभागीय सहाय्यक पोलीस अधिकारी हे हजर होते. तसेच प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त परिमंडळ पोलीस आयुक्त यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week