दहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला अटक !!

दहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला अटक !!

      हत्तेच्या गुन्ह्यात मागील दहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला शनिवारी अटक करण्यात आचोळे पोलिसांना यश मिळाले आहे. नालासोपारा येथील चहाच्या दुकानात १७ मे २०२३ मध्ये शिवम मिश्रा, किशन झा (१८) आणि रौनक तिवारी (१८) या तीन मित्रांमध्ये हाणामारी झाली होती या मारहाणीत तिघेही जखमी झाले होते त्यावेळी रौनक तिवारी याचा मृत्यू झाला होता. तर किसन झा मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात तर शिवम मिश्रा याच्यावर के. ई. एम. रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर उपचारादरम्यान किसनचा याचाही मृत्यू झाला होता ही हत्या शिवम मिश्रा यानेच केल्याने आचोळे पोलिसांना संशय असल्याने त्याला गुन्ह्यातील संशयित आरोपी केले होते. तसेच हे हत्याकांड प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून घडले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. संशयित आरोपीने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जिल्हा सत्र न्यायालय वसई तसेच उच्च न्यायालय मुंबई येथे अटकपूर्व जामीन मिळणे कामी अर्ज दाखल केला होता. गुन्ह्यात उत्कृष्ट तपास अथांग प्रयत्न करून प्राप्त केलेले भौतिक तांत्रिक परिस्थितीजन्य पुरावे तसेच प्रथमदर्शनी साक्षीदार या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. त्यानंतर शनिवारी दोन स्वतंत्र पथक तयार करून आरोपीचा शोध घेऊन त्याला नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यावर सदरचा गुन्हा हा त्यानेच केल्याचे कबूल केले. त्यानेच केलेल्या खुनाचे भक्कम पुरावे प्राप्त झाल्याने आरोपी शिवम मिश्रा (२०) याला दहा महिन्याच्या कालावधीनंतर हत्तेच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

     सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले शृंगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजोळे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे विवेक सोनवणे, पोलीस हवालदार आनंदा चौरे, मोतीराम गारे, राहुल मुळे, स्वाती माने, सागर वाकचौरे, शरद उगलमुगले, बाळू आव्हाड यांनी केली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week