मुर्गन अण्णा धारावीचा डॉन ! धारावीच्या लोकांसाठी असलेला देव माणूस नालासोपारा पोलिसांनी केला जेरबंद !!
राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकून सव्वा पाच कोटी रोख रकमेची लूट करणाऱ्या आरोपींना शिताफिने केले अटक !!
मराठी चित्रपट ज्योतिबाचा नवस चित्रपटासारखी घडलेली कहाणी !
मुंबई येथील धारावी विभागात गरिबांचा देव माणूस समजल्या जाणाऱ्या मुरुगन अण्णा अर्थात मुरगनंदन अभिमन्यू याला व त्याच्या साथीदारांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली. मूरगनंदन (अण्णा) हा धारावीचा डॉन ! तसेच एक समाजसेवकही आहे. माटुंगा धारावी येथील रहिवाशी असून, कॉमर्स शाखेचा पदवीधर आहे. पूर्वीपासून त्याला समाजकार्याची आवड होती. त्यांनी लोकांकडून २५,२५ रुपये चंदा घेऊन "साउथ हेल्पर चॅरिटेबल ट्रस्ट"ची स्थापना २००६ साली केली होती. न केलेल्या गुन्ह्याच्या दोषाखाली त्याने अकरा वर्षे तुरुंगात काढले ११ वर्षानंतर त्याने साउथ "हेल्प चॅरिटेबल ट्रस्ट"तर्फे गरीबलोकांसाठी मोफत असलेले डायग्लोनीज सेंटर व पॅथॉलॉजी ची स्थापना केली. परंतु तो डॉन असूनही धारावीची जनता त्याला अण्णा देव माणूस म्हणून मानतात.
दिनांक १७/३/०२४ रोजी गुजरातच्या व्यापाऱ्याची पाच कोटी पंधरा लाख रुपयांची रोख रक्कम त्याचे तीन कर्मचारी हे हुंदाई क्रेटा कार मधून सुरत ते मुंबईमध्ये नेत असताना रात्री आठ ते नऊच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या मुंबई वाहिनीवरील खानिवडे टोल प्लाझा पुढे एका मारुती वॅगनार कारमधून आलेल्या पाच अनोळखी आरोपींनी क्रेटा कार मध्ये बसलेले फिर्यादी व साक्षीदार यांना पोलीस असल्याची बतावणी करून व मारहाण केली. त्यानंतर कार मध्ये असलेल्या तिघांपैकी एकाला आरोपींनी स्वतःच्या वेगनार कार मध्ये बसवले तसेच कार मध्ये असलेली रोख रक्कम आणि इतर दोन साक्षीदार यांच्यासह हुंडाई क्रेटा कार जबरीने ताब्यामध्ये घेऊन आरोपी निघून गेले. दरम्यान आरोपींनी क्रेटा कार मध्ये असलेल्या दोन साक्षीदारांना मारहाण व दमदाटी करून त्यांचा मोबाईल फोन फेकून देऊन त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावरून कारमधून उतरवले आणि रोख रकमेसह कार घेऊन पळून गेले सदर बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मांडवी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर रात्री दरम्यान दरोड्याचा गंभीर गुन्हा घडला असल्याने माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तपास कक्ष तीन गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे दिनांक १९/३/०२४ रोजी आरोपी १)मुरगनंदन अभिमन्यू वय वर्ष ४६ राहणार माटुंगा मुंबई २) बाबू मोडा स्वामी वय ४८ वर्ष राहणार कांदिवली पश्चिम मुंबई ३) मणिकंडंन चलैया वय ५० वर्षे राहणार भाईंदर पूर्व ४) बालाप्रभू क्षनमुगम, वय ३९ वर्षे राहणार सायन मुंबई यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासामध्ये त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आलेली असून दिनांक २८/३/०२४ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे.
तपासा दरम्यान पाहिजे असले आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्यांचा तपास सुरू आहे आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल
१)४,८७,५०,००० रोख रक्कम
२) १०,००,००० किंमतीची हुंडाई क्रेटा कार रजिस्ट्रेशन क्रमांक जीजे ३३ एफ ५९०६
३) ३,००,,००० रुपये किमतीची मारुती वॅगनार रजिस्ट्रेशन क्रमांक ४३ बी यु ००८०
४) मोबाईल फोन इत्यादी ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्ह्याचा आरोपी मुरुगनंदन अभिमन्यू धारावी याचा पूर्व इतिहास पडताळून पाहता त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्ह्याचा दोषी सिद्ध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी श्री. अविनाश अंभोरे पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, सागर बारवरकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुमित जाधव, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, तुषार दळवी, अतिश पवार, मनोहर तारडे, प्रवीण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे व सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सायबर सेल यांनी पार पाडली आहे.