साक्षीदार !!
उध्वस्त केलंस माझं
भावनांच एकमेव आभाळ
आता येणारा पाऊस
अन शेणारी वादळे
मी कशाच्या बळावर थो
मला सावरता येत नाहीत
माझी ढासळलेली क्षितिज
अन शोधतहीही येत नाहीत
माझी हरवलेली नक्षत्रे
मला अंधार पोकळीत
पाहता येत नाही
माझा काळवलेला चंद्र
मी माझ्या या एकमेव आभाळाची
एकमेव उध्वस्त
साक्षीदार
पण
तुझ्या इतकाच मला हे माहित आहे
छाटल्याशिवाय झाड वाढत नाही
अन मांडवा शिवाय वेल चढत नाही.
प्रीती तिवारी !!