बनावट कागदपत्र बनविणारी टोळी गजाआड !!

बनावट कागदपत्र बनविणारी टोळी गजाआड !!

        मुंबई गुन्हे कक्ष ६ कार्यालय यांनी दिनांक ३ मार्च रोजी बनावट कागदपत्र बनविणारी एक टोळी गजाआड केली. मानखुर्द मुंबई या ठिकाणी काही इसम मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे व जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्याचे अटक आरोपी यांच्या जामीना करता लागणाऱ्या वेगवेगळ्या जामीनदारांचे बनावटी कागदपत्रासह जामीनदारांना उदाहरणार्थ रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, पेमेंट स्लिप, बँक स्टेटमेंट, रेशनिंग कार्ड, इत्यादी कागदपत्रे लॅपटॉप वर तयार करून यावर विविध शासकीय, खाजगी कार्यालयाचे रबरी स्टॅम्प मारून तयार केलेल्या बनावटी कागदपत्रासह तोतया जामीनदारांस मा. न्यायालयासमोर उभे करून जामीन मिळवून देतात. अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. 

        सदरच्या बातमीचा पाठपुरावा करून मिळालेल्या गोपनीय बातमीची सर्वांगीण शहनिशा करून नियोजन पूर्व मुंबई गुन्हे शाखा कक्ष ६ कार्यालयातील पथकाने महात्मा फुले नगर मानखुर्द या ठिकाणी छापा टाकून घटनास्थळावरून आरोपी अमित नारायण गीजे वय वर्ष ४४ २) बंडू वामन कोरडे वय वर्ष ४४ यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून लागलीच विविध पथके तयार करून नियोजन पूर्वक १) अहमद काशीद शेख वय वर्ष ४४ छेडा नगर मुंबई येथून तसेच संजीव सोहनलाल गुप्ता वय वर्षे ३४ ह्यास भिवंडी ठाणे येथून तसेच उमेश अर्जुन कावले वय वर्ष ४८ याला कल्याण ठाणे येथून, पाच आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड वेगवेगळ्या कंपन्यांची ओळखपत्रे, पॅन कार्ड महापालिकेच्या कर पावत्या एक लॅपटॉप एक मल्टिपल प्रिंटर, एक मिनी लॅमिनेटर एकाच समूहाचे वेगवेगळ्या नावांनी तयार केलेली आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड बँक स्टेटमेंट, सॉलव्हनसी, विविध कंपन्यांची ओळखपत्रे अशी बनावट कागदपत्रे हस्तगत केलेली आहेत. वरील ताब्यात घेतलेल्या आरोपीतांविरुद्ध मानखुर्द पोलीस ठाणे मुंबई गुन्हा क्रमांक १२५/विशेष कलम ४२०,४६५,४६७,४४८ ४७१,४७३ ४७४, ४७५,४७६,१२० सह भारतीय दंड विधान अन्वये अटक करण्यात आलेली आहे.

          सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, माननीय विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, माननीय पोलीस सह आयुक्त गुन्हे लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शशी कुमार मीना, पोलीस उपायुक्त प्रकटीकरण विशाल ठाकूर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डी पूर्व चंद्रकांत जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ६ चे पोलीस प्रभारी पोलीस निरीक्षक श्री रवींद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक पवार, पोलीस निरीक्षक ननावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे, पोलीस उपनिरीक्षक मुठे, रहाणे, महिला पोलीस उपनिरीक्षक माशेरे, ओपन निरीक्षक बेळणेकर, पोलीस उपनिरीक्षक सावंत सकपाळ, आव्हाड, सहाय्यक फौजदार कु, देसाई, पोलीस हवालदार पारकर तुपे, पोलीस हवालदार वानखेडे, शिंदे, गायकवाड, मोरे घेरडे, पोलीस शिपाई माळवेकर, कोळेकर, महिला पोलीस शिपाई अभंग, पोलीस शिपाई पवार, महिला पोलीस शिपाई सुतार, पोलीस हवालदार चालक डाळे आणि पोलीस शिपाई चा. पाटील यांनी पार पाडली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week