जखडू नकोस माझ्या भावनांना !!

जखडू नकोस माझ्या भावनांना !!

जखडू नकोस 

माझ्या भावनांना

बांधूनी कोमल 

हृदयात स्पंदनांना


नितळ सुंदर 

तुझिया प्रीतीत  

अशी का होते

उगा मी व्यथीत.


जाणून घेशील ना 

जरासेच मजला

हृदयाच्या कुपित

मोगरा  सजला


देतोस मजला 

अदृश्य साथ

जाणवी मजला

नित्य दिन रात.


कधी दिसतोस

शिव गाभाऱ्यातील

अमृत जलधारा 

विष कंठातील.


कसे पचवितो

वादळे झेलतो

तरी शांत चित्त

मज भासवितो.


कृष्ण सखा

होतोस कधीतरी

धावूनी तूच तर

येतोस झडकरी.

                 सोनाली जगताप....


Batmikar
बातमीकार