गरज ना तुला शृंगारची !!

गरज ना तुला शृंगारची !!

चारोळ्या 

गरज ना तुला शृंगारची 

मी नजरेने सौंदर्य तुझे

 उजळू शकतो

 मी रक्ताचा

 कवी जातिवंत 

तुला माझ्या शब्दांनी 

सजवू शकतो 


केवळ फुलांचा हव्यास तुला

 मी काट्यांना कवटाळले होते

 शब्द उदार इतका की 

 मी सुखाला झिडकारले होते



मला माहित नाही 

ती कुणाची पौर्णिमा होती

 तरी तो चंद्र मी माझ्या

 उशाशी ठेवला आहे 


अलवार कवेत येताच 

आज माझे पण परके झाले

 जे काही होते माझे 

तुला समर्पित झाले 


लटकाच राग तिचा किती मी टाळला आहे 

माळावया गुलाब आणि मी मोगरा आणला आहे

 सोडण्यासाठी अबोला मी 

आर्जवावे किती

रोजच्या आश्वासनांना का 

मी फसलो आहे 

कशास, शब्दामध्ये विचारू 

तिला पुन्हा आता

 खट्याळ नजरेमधे सारा निकाल आहे...


                            ध्रुव खुरे (पुणे)


Batmikar
बातमीकार