खुनाचा कट रचणारा, मुंबईमध्ये दहशत माजविणारा कुविख्यात गुंड अग्नी शस्त्रासह अटकेत !!

         दिनांक ६/४/२०२१ रोजी नवतरून नगर, कृष्णा हॉटेलच्या पाठीमागे, अँन्टॉपहिल कोकरी आगार, परिसरात पहाटे पाच चाळीसच्या सुमारास सायकल वरून आलेल्या अज्ञात इसमाने एका इसमावर गोळीबार करून पसार झाल्याची घटना घडली होती. सदर झाल्या प्रकरणाबाबत अँन्टॉपहिल पोलीस ठाण्याने त्या ठिकाणी अज्ञात इसमाच्या विरोधात वरील प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. सदर गुन्ह्याच्या समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत होता. त्याकरता गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके स्थापन करून अज्ञात इसमाचा शोध घेण्यात येत होता. 

       दिनांक ९/ ४/२०२५ रोजी गुन्हे शाखेकडून स्थापन करण्यात आलेल्या पथकांमार्फत तांत्रिक बाबीचा अभ्यास करून तसेच पारंपरिक मानवी कौशल्याच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना, नमूद आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवून डोंबिवली परिसरात लपून बसला असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा कक्षाला प्राप्त झाली होती. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली परिसरातील कोळेगाव, खटई नाका या ठिकाणी गुप्तपणे सापळा रचून थांबले असता, नमूद गुन्ह्यातील आरोपी हा सदर ठिकाणी पहाटेच्या सुमारास आला असता त्यास पथकाने पळून जाण्याची संधी न देता घेराव खालून झडप टाकून ताब्यात घेतले व त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या सेटबॅग मध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल व सहा जिवंत काडतुसे व एक रिकामी पुंगळी, तसेच त्याने वापरलेले कपडे मिळून आले ते पंचनामे अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहेत.

      नमूद आरोपीकडे चौकशी केली असता आरोपि विवेक देवराज शेट्टीयार वय २६ वर्ष, यास माननीय न्यायालयाने कोविड कालावधीत अभिवचने रजेवर सोडले होते. त्यानंतर तो पुन्हा कारागृहामध्ये हजर झालेला नाही. त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न व अग्निशस्त्र जवळ बाळगणे अशा प्रकारचे एकूण बारा गंभीर गुन्हे दाखल असल्याची व त्याच्या विरोधात वेगवेगळ्या न्यायालयात अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केलेली आहेत. आरोपीच्या कडे चौकशी केली असता तो नजीकच्या काळामध्ये आणखी दोन इसमांवर जीव घेणा हल्ला करणार असल्याची माहिती समजून आली. होती अशा प्रकारे नमूद आरोपीमुळे दोन इसमांचे प्राण वाचविण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. हा इसम गुंड प्रवृत्तीचा असून काहीही कामधंदा न करणारा चोऱ्या माऱ्या करणारा असा हा आरोपी असल्याची माहिती डीसीपी श्री दत्ता नलावडे यांनी दिली.

           सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर, माननीय विशेष पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, माननीय पोलीस सह आयुक्त गुन्हे श्री लखमी गौतम, माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शशी मीना, माननीय पोलीस उप आयुक्त प्रकटीकरण श्री दत्ता नलावडे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त (डी) मध्य श्री वेतन काकडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, पोलीस निरीक्षक अजित गोंधळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजरा बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक शामसुंदर भिसे, पोलीस उपनिरीक्षक भावे, सहायक फौजदार वशिष्ठ कोकणे, सहाय्यक फौजदार शेवडे, पोलीस हवालदार शरद शिंदे, पोलीस हवालदार निर्भवणे, पोलीस हवालदार संजय तुपे, पोलीस हवालदार देवार्डे, पोलीस शिपाई संजय गायकवाड ,पोलीस शिपाई प्रमोद पाटील, पोलीस शिपाई शुभम सावंत, पोलीस शिपाई सय्यद, पोलीस शिपाई चालक प्रसाद, व चव्हाण यांनी यशस्वी पार केलेली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week