मुझसे शादी करोगी?????

फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम अशा अनेक सोशल मीडियाचा सुकाळ झालेला आहे. आणि आज सोशल मीडियावर चांगल्या प्रमाणे वाटही गोष्टी खूप खपत असतात. कुठे काहीतरी चांगलं होत असतं. तर कितीतरी जणांची फसगत होत असते. तर कधी कधी कुठेतरी तरी कुणा सोबत प्रेम संबंध जुळत असतात. ह्या प्रेम संबंधाचे शेवट नेहमी वाईटच पाहायला मिळतात. कारण फेसबुक हे आभासी दुनिया आहे आणि त्याच्यामध्ये कितपत खरं सत्य आहे हे ओळखू  शकत नाही. चांगल्या व्यक्ती सोबत मैत्री यशस्वी झाली आणि अश्या चांगल्या व्यक्तीची निवड केली तर तो स्वतः भाग्यवान ! पण कधी कधी टाईमपास म्हणून करत असलेला प्रेम संबंध हा अतिशय क्रूर असा निर्णय घेण्यास भाग पाडतो कधी फेसबुकवर प्रेम जमत आणि लग्नाची वचने दिली जातात आणि अश्या लग्नाच्या नकली आमिषाला कितीतरी मुली बळी पडतात, स्वतःची संपत्ती घालवितात.  

          असेच ऑनलाईन महिलांना लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या विश्वास संपादन करून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत प्रेमी गुंडाला मुंबई पोलिसांनी प्रेमाच्या बेड्या ठोकल्या. मे २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये इमरानअली फैजअली खान हैदराबाद या प्रेमी आशिक ने फिर्यादी महिलेस ऑनलाईन वर लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून वेळोवेळी फिर्यादीकडे खोटी कारणे सांगून पैशाची मागणी करीत

 होता.

          अशा प्रकारे फिर्यादी महिलेकडून इमरानअली खान याने २१.७३.५०२/- रोख पेटीएम, एनईएफटी या माध्यमातून घेतले व फिर्यादी महिलेस परत केले नाहीत. या प्रकारे आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याबद्दल फिर्यादी महिलेने पायधुनी पोलीस ठाणे येथे आरोपी इमरानअली खान याचे विरुद्ध तक्रार नोंदवली होती. या अनुषंगाने पायधुनी पोलीस ठाणे येथे इमरान अली खान याचे विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४०६, ४२० याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.

       गुन्ह्यातील आरोपी वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता व पोलिसांचे लक्ष विचलित करीत होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांना अपयश येत होत. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सखोल तपास केला. तपासा अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्याचा तांत्रिक पुराव्याचे विश्लेषण करून त्या आधारे आरोपीच्या वास्तवा बाबत उचित माहिती प्राप्त करून आरोपीस मोठ्या शिताफीने हैदराबाद येथून अटक केले.

        आरोपी इमरानअली फैजअली खान, ह्याचाकडे सखोल चौकशी केली असता, त्याचा सदर दाखल गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन् झाले व सदरचा आरोपी हा सराईत गुंड असल्याचे चौकशीत समजले. भारतात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

         आरोपीवर हैदराबाद येथील चंचलगुडा पोलीस ठाणे येथे दोन गुन्हे, दाबेर पुरा पोलीस ठाणे हैदराबाद येथे सहा गुन्हे दाखल आहेत.

         तसेच सदर आरोपीवर गंगाखेड पोलीस ठाणे परभणी महाराष्ट्र येथे दोन गुन्हे दाखल आहेत.

         सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन डॉक्टर मोहित कुमार गर्ग, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पायधूनी विभाग श्रीमती ज्योत्सना रासम, यांच्या मार्गदर्शनाखाली पायधूनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन पगार, गुन्हे पोलीस उपनिरीक्षक अनिल वायाळ, पोलीस हवालदार कैलास भोईटे, इरफान खान, दीपक निकम व परब (व्ही. पी. रोड पोलीस ठाणे), पोलीस शिपाई शंकर राठोड, नितेश घोडे, प्रकाश अलवर विलास पाडवी यांनी केली आहे.

        नागरिकांना मुंबई पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारे ऑनलाइन सायबर माध्यमाद्वारे संपर्क केल्यास योग्य पडताळणी करावी. अशाप्रकारे फसवणूक करीत असल्यास त्वरित मुंबई पोलिसांची संपर्क करावा.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week