मिसिंग इसमाच्या मृत्यूचे उलगडले रहस्य ????

मिसिंग इसमाच्या मृत्यूचे उलगडले रहस्य ????

      विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक १४/४/२४ रोजी रमेश बालन नायर वय वर्ष 48, राहणार साई छाया अपार्टमेंट, सहकार नगर, विरार पूर्व हा इसम घरात कुणाला काहीच न सांगता निघून गेला, याबाबत लीला नायर वय ७० वर्ष या महिलेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.


शोध मोहीम पोलीस हवालदार समाधान चव्हाण विरार पोलीस ठाणे हे करीत होते. सदरच्या मिसिंग इसमास गोविंद खानिया उर्फ भुऱ्या या इसमासह शेवटचे पाहिले गेले होते. त्यानंतर गोविंद खानिया उर्फ भुऱ्या हा देखील आढळून आला नाही म्हणून त्याच्याविरुद्ध संशय व्यक्त केला जात होता.

        सदरचे प्रकरण लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी विरार पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांस व अंमलदार यांना सदरच्या प्रकरणाची सखल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.. वरिष्ठांच्या आदेशानुसार मिसिंग इसमाची व संशयित इसमाची अशी माहिती त्यांनी दिली. तांत्रिक माहिती गोळा करून शोध घेत असताना, तो वैतरणा रेल्वे स्टेशन येथे आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्याजोगे पोलिसांनी सापळा रचून संशयित इसम गोविंद खानिया उर्फ भुऱ्या राहणार कोपरी, विरार पूर्व ह्यास ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन मिसिंग इसमाची चौकशी केली असता त्याच्याकडून माहिती मिळाली की, मिसिंग इसमाने संशयित इसमाच्या प्रेमिकेची छेड काढून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली असल्याने गोविंद खानिया उर्फ भुऱ्या ह्यास राग आला.


       गोविंद खानिया याने मिसिंग इसमास साईनगर वैष्णवी मंदिराजवळ डोंगरावर नेऊन त्याला ठोशा बुक्क्यासह मारहाण केली व त्याचे लिंग पिरगळून त्याच जीवे ठार मारले. अशी माहिती त्यांने दिली. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याचा अभिलेख तपासले असता दिनांक १४/४/०२४ रोजी एक बेवारस इसमाचे प्रेत मिळून आले होते. विरार पोलीस ठाण्याने बेवारस इसमाच्या प्रेताची आकस्मित मृत्यूची नोंद केली होती.


         यावरून आरोपी गोविंद खाणी उर्फ भुऱ्या राहणार कोपरी, विरार पूर्व याच्या विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पालांडे, विरार पालघर ठाणे, यांनी दिलेल्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक t३७७ भारतीय दंड विधान कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

        सदरची कामगिरी पोलीस उपयुक्त जयंत बजबले, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ विरार, श्री बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त विरार यांच्या मार्गदर्शनाखाली, विरार पोलीस ठाण्याचे श्री विजय पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पालांडे, पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण, पोलीस हवालदार समाधान चव्हाण, इंद्रनील पाटील, संदीप शेरमाळे, पोलीस अंमलदार बालाजी गायकवाड, सर्व नेम विरार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पडली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week