बांद्रा युनिट ६ लोहमार्ग यांची उल्लेखनिय कामगिरी, महिला प्रवाशांचे चेन मंगळसूत्र जबरीने चोरणाऱ्या आरोपीस अटक !!

बांद्रा युनिट ६ लोहमार्ग यांची उल्लेखनिय कामगिरी, महिला प्रवाशांचे चेन मंगळसूत्र जबरीने चोरणाऱ्या आरोपीस अटक !!

 दिनांक २२/५/२४ रोजी दुपारी २.५० वाजताच्या सुमारास सौ. मदुरा मंगेश गुरव या दादर रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ५ वर दादर विरार लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्यामधून प्रवास करीत होत्या. लोकल सुरू झाल्यानंतर डब्यामध्ये चढलेल्या आरोपीने मधुरा गुरव यांच्या गळ्यामध्ये असलेले सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचुन चालत्या लोकल मधून उडी मारून तो पळून गेला. सदर बाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर ४३८/२०२४ भारतीय दंड विधान कलम ३९२ अन्वये अनोळखी इसमावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.



         गुन्ह्याचा समांतर तपास हा गुन्हे शाखा युनिट ६ बांद्रा लोहमार्ग पोलीस यांच्यामार्फत करण्यात आला. तपासा दरम्यान दादर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी जबरी चोरी करून पळून जाताना दिसला. त्यानंतर गुप्त बातमीदाराकडून आरोपीची माहिती घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीवर दाखल गुन्ह्याच्या आरोपाच्या अनुषंगाने तपास करण्यात आला असून आरोपीचा सदर गुन्ह्यत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरी केलेले मंगळसूत्र त्याच्या साथीधारा मार्फत वितळवल्याचे निष्पन्न झाले असून त्याला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून ८० हजार किमतीची चोरी केलेली सोन्याची लगडही हस्तगत केलेली आहे. आरोपी हा रेल्वेच्या महिला डब्यातून सोन्याचे दागिने घातलेल्या महिलांना हेरून ते जबरीने खेचून सुरू असलेल्या लोकल मधून उडी मारून पळून जात असे.

आरोपीचे नाव मतीउ रहमान अब्दुल हकीम शेख उर्फ आजाद मुकद्दर खान, वय वर्ष 32 राहणार झोपडपट्टी नंबर४३, टी.व्ही.एस रोड वाड बंदर मुंबई जे जे नाका हॉस्पिटल जवळ फुथपाथ, मुंबई फिरस्ता. मुळगाव, लाउटर पाडा तालुका बिरमूर, पोस्ट ठाणे साउथया, राज्य पश्चिम बंगाल. दुसरा आरोपी कीर्तीराम रामतेवल नायक, वय वर्ष 51, रूम नंबर एक, जगदीश बिल्डिंगच्या पाठीमागे, मुंबादेवी कंपाउंड च्या मागे, कालबादेवी रोड मुंबई असे असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

           सदरची कामगिरी माननीय रविंद्र शिसवे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई, श्री मनोज पाटील उपायुक्त मध्य परिमंडळ, श्री राजेंद्र रानमाळे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री आरशुउद्दीन शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री रोहित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिजीत भुपेंद्र टेलर, सहाय्यक पोलीस फौजदार गणेश शिरसागर, रवींद्र दरेकर पोलीस हवालदार महेश सुर्वे, सोमनाथ गायकवाड, सुरेश एल्ला, वैभव शिंदे, प्रशांत साळुंखे, पोलीस नायक सिकंदर तडवी, सत्यजित कांबळे, अमरसिंह वळवी, पोलीस अंमलदार सागर हिंगे, अक्षय देसाई, सुनील मागाडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.




Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week