कसा आहे कुठे आहे......

कसा आहे कुठे आहे......

 कसा आहे कुठे आहे कसे सांगू तुला

तू विजांचा शोध घे त्या काल कोसळल्या कुठे !..


जीव घेणाऱ्या व्यथेवर जीव जडला शेवटी

तू दिलेल्या वेदनाही वेदना उरल्या कुठे ?..


फार काही सोसण्याची हाव नाही राहिली 

चार घावांनी मला बघ आणले कुठल्या कुठे !..


झेपल्या नसत्या तुलाही फारशा माझ्या झळा 

या उन्हाला सोसणाऱ्या सावल्या उरल्या कुठे ?..


एकही टिकला न धागा आपल्या दोघातला

पण तुझ्याशी बांधल्या गाठी मला सुटल्या कुठे ?


लावल्या सगळ्या घराला तू जरी काचा उद्या

पावसामागून येणाऱ्या सरी चुकल्या कुठे !..


खूप झाल्या सांत्वना पण यातना कळल्या कुठे

पाहिल्या खपल्याच तू जखमा तुला दिसल्या कुठे ?..


ध्रुव (पुणे)

७६२०००९४७४


Batmikar
बातमीकार