मै आयकर अधिकारी हू !!
आयकर अधिकारी असल्याचा नकली दावा करून करोडो रुपयाचा गंडा घालणाऱ्या फर्जी आयकर आयुक्ताला केली अटक....
सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना आयकर विभागात वरिष्ठ पदावर नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून सुमारे दोन कोटी रुपये पेक्षा जास्त रकमेची फसवणूक करणाऱ्या तोतया आयुक्ताला अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांना यश.
दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी फिर्यादी सफरुद्दीन नैमुद्दीन खान यांनी पेल्हार पोलीस ठाणे येथे फिर्याद नोंदवली की रिंकू शर्मा नामक एका तोतया इसमाने स्वतः आयकर आयुक्त आय. आर. एस. अधिकारी असल्याचे भासवून आयकर विभागाचा लोगो वापरून तसेच अंबर दिव्याचे वाहन वापरून, फिर्यादी यांची मुलगीला आयकर विभागात निरीक्षक या पदावर नोकरी लावून देतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून, वेळोवेळी १५ लाख रुपये घेऊन फिर्यादी यांच्या मुलीस आयकर विभागाचे आयकर निरीक्षक बनावट ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन, फिर्यादी यांच्या मुलीला नोकरी लावून न देता फसवणूक केली.
आरोपी रिंकू शर्मा वय वर्ष ३३ पेशा ड्रायव्हर राहणार सिद्धिविनायक होम सोसायटी, सर्वे नंबर ३०, तळोजा, फेस २, आरटीओ जवळ, नवी मुंबई. हा कंत्राटी कामगार म्हणून आयकर विभाग येथे नोकरी करीत होता. वेळोवेळी आयकर अधिकाऱ्यांना तो गाडीने सोडत असे त्याच्यातून हळूहळू त्याने आयटी डिपार्टमेंटची माहिती घेऊन त्याला फसवणूक करण्याची शक्कल सुचली.
मूळचा जोनपुरचा रहिवासी असलेला रिंकू शर्मा नालासोपारा येथे राहत होता. अंबर दिव्याची गाडी वापरून वेळोवेळी आपण आयकर आयुक्त असल्याचे भासवत होता. आणि बऱ्याच सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना आपण नोकरी देऊ असे आमिष देऊन त्यांची त्याने फसवणूक केली. फिर्यादी सफरुद्दीन नईमुद्दीन खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक ७/१/२०२५ रोजी रिंकू शर्मा याला तळोजा वरून अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी त्याला फरमावली आहे. आरोपीकडून अधिक चौकशी करता असे एकूण ४० जणांना त्यांनी बनावटी आयकर आयुक्त निरीक्षक अशी नियुक्तीपत्रे देऊन करोडो रुपयाचा गंडा घातलेला आहे.
त्याच्या कब्जात एकूण २८ विविध बनावट ओळखपत्रे मिळून आली त्यात आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त व आयकर निरीक्षक गृह विभागाचे सहाय्यक आयुक्त सीबीआय विभागाचे पोलीस आयुक्त या ओळखपत्रांचा समावेश आहे
मुक्त आरोपी रिंकू शर्मा यास पुढील कारवाई करिता आपल्याला पोलीस ठाणे पुन्हा रजिस्टर नंबर ९६८, विशेष ३१८,(४)२०४, ३१९,२३८,३३६, ३४०(२) ३(५) याप्रमाणे गुन्ह्यात हजर करण्यात आले आहे. उपरोक्त कामगिरी श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त, श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, श्री अविनाश अंभोरे पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवरकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुमित जाधव, युवराज वाघमोडे, सुनील पाटील, मनोहर तारडे, तुषार दळवी, अतिश पवार, महाराष्ट्र सुरक्षा बल, सागर सोनवणे, प्रवीण वानखेडे, गणेश hयादव, सर्व गुन्हे शाखा कक्ष (३) विरार तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सायबर सेल यांनी पार पाडली आहे .