दोन परदेशी नागरिकांसह एक भारतीय महिला यांचे कडून २२,३३,८५००० रुपयांचा कोकेन केला जप्त !!

दोन परदेशी नागरिकांसह एक भारतीय महिला यांचे कडून २२,३३,८५००० रुपयांचा कोकेन केला जप्त !!

       दिनांक १५/४/०२५ रोजी काशिमिरा पोलीस ठाणे येथील अंमलदार यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की, सबीना शेख, रा. मोतीलाल नगर भाईंदर पूर्व तिच्या घरात विक्रीसाठी आणलेले अमली पदार्थ लपवून ठेवले आहेत. म्हणून कक्ष एक काशिमिरा पोलीस ठाणे येथील टीमने तिच्या घरावर छापा टाकून घराची झडती घेतली असता, सबीना शेख वय वर्ष ४२ हिच्या घरात एकूण १७,७४,५०,०००/-किमतीचा ११ किलो ८४० ग्रॅम वजनाचा कोकेन नावाचा अमली पदार्थ व ८०,०००/- रुपये रोख इतका ऐवज मिळून आला.

          सदर गुन्ह्याचे गांभीर्य व व्याप्ती लक्षात घेऊन, सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशावरून गुन्हे शाखा एक काशिमिरा यांच्याकडे देण्यात आला आहे. तपासा दरम्यान अटक आरोपी सबीना शेख तिच्या ताब्यात मिळून आलेला कोकेन हा अमली पदार्थ एक नायजेरियन नागरिक अँडी नामे असलेल्या इसमाने तिच्याजवळ दिला होता असे समजले.

       नायजेरियन नागरिक आरोपी अँडी उबाबूडीके  अन्योन्यस (Andy  Ubabudike Onyinse) वय वर्ष ४५, रा. हत्केश नियर जीसीसी क्लब मीरा रोड (Hatkesh, near GCC club Mira road East). Permanent address 70, Ali Avenue Lagos, State  Nigeria. ह्यास दिनांक १५/४/२५ रोजी अटक करून त्याच्या ताब्यातून ३,९०,७२,०००/- तीन कोटी नव्वद लाख बहात्तर हजार इतकी रक्कम ताब्यात घेण्यात आली.

         आरोपी अँडी ओबाबूडीके ह्याच्याकडे चौकशी केली असता तपासा दरम्यान मिळालेले अमली पदार्थ त्याची महिला साथीदार क्रिस्टाबेल  एन्जइ (Christabel Enjei) रा. वसई पूर्व तिच्याकडून घेत असल्याचे सांगितले. दिनांक १५/४/२५ रोजी कॅमेरून या देशाची नागरिक असलेली महिला मिस क्रिस्टबेल एन्जइ miss Christabel Enjei age 32 residential Evershine City, sector 6 Vasai East. Permanent address Youande Bamenda, Camearoon. हीस अटक करून तिच्या ताब्यातून ६४,९८०००/- चौसष्ठ लाख अठ्यानऊ हजार किंमतीचा ४३३ ग्रॅम २ मिलीग्रॅम इतक्या वजनाचा कोकेन, तसेच एक लाख भारतीय चलनाची रोख रक्कम, वन नायजेरियन चलना मधील हजार नोटा ५००, नायरा दराच्या ४८ नोटा व अमेरिकन १०० डॉलर दराच्या १४ नोटा असे परकीय चलन व चार फोन देखील हस्तगत करण्यात आले. एकूण २२ कोटी ३३ लाख ८५ हजार ४३० इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

          नमूद गुन्ह्याच्या तपासांतर्गत गुन्ह्यामध्ये एक पुरुष व दोन महिला आरोपी यास अटक करण्यात आली आहे.

        वरील कामगिरी मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे आयुक्त माननीय श्री मधुकर पाण्डेय, आयुक्त माननीय दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे माननीय श्री अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री भास्कर पुकळे, सहायक पोलिस आयुक्त आंथीक गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष एक काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक श्री प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील, अविनाश गरजे संतोष लांडगे, पुष्पेन्द्र थापा, संजय शिंदे,  हवालदार अश्विन पाटील, सचिन हुले, सुधीर खोत, पोलीस अंमलदार प्रशांत विसपुते, धीरज मेंगाणे, गौरव बारी, सौरव इंगळे, महिला सहाय्यक फौजदार दिपाली जाधव, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, (सायबर गुन्हे शाखा), महाराष्ट्र सुरक्षा बल (मसुब) किरण आसवले यांनी केली आहे.

          सदर गुन्ह्याचा तपास काशिमिरा पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत हे करीत आहेत.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week