...तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे, हे लक्षात ठेवा : मनसेचा इशारा !

...तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे, हे लक्षात ठेवा : मनसेचा इशारा !

    मुंबईतील वांद्रे स्थनकाजवळ मंगळवारी परप्रांतीयांची गर्दी जमल्याचा प्रकारानंतर भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच भाजपाच्या समर्थकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सोशल मीडियावरुन करण्यात येत होती. या सर्व प्रकरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संकटाच्या काळात राजकारण करु नका असं आवाहन देखील केलं होतं. आता मनसेनेही उद्धव ठाकरेंच्या समर्थनांसाठी मैदानात उतरली आहे. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत. पण जर महाराष्ट्राचं काही नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर, मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे हे लक्षात ठेवा, असं रुपाली पाटील यांनी सांगतिले.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week