मराठीत आर्थिक व्यवहार व्हावेत !

मराठीत आर्थिक व्यवहार व्हावेत !

        मराठी भाषा संवर्धन पंधरवधा दर वर्षाप्रमाणे साजरा करण्यात येतो. भाषा भरजरी तरी तिचा उत्सव जरतारी असे नुसते प्रसिद्ध होते. तरी मराठी राजभाषा जाहीर झाली असली तरी, सरकारी कामकाजामध्ये सक्तीची केली आहे. त्याच प्रमाणे न्यायालयाने पण मराठी भाषा येत नसेल तर शिकून घ्यावे असा निर्णय दिला आहे. तरी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल त्यावेळी मिळेल. परंतु आता मराठी देवनागरी लिपीला प्राधान्य अजून ही मिळत नाही. इंग्रजी शिकलेल्यांनी मराठी भाषे करीता मराठी मध्येच आर्थिक व्यवहार करावयास हवेत. बँक, विमा कंपन्या, महापालिका, शासन, म्यूत्युल फंड, मोबाईल कंपन्या, इ चे ऑनलाईन बँक व्यवहार होत असले तरी, बिल वगेरे चे चेक देताना, संपूर्ण मराठी देवनागरी लिपीत, अंक, आकडे मराठी भाषेत असावेत. दरावरील पाट्या मराठीत असावेत. त्याचप्रमाणे मराठी वाहिन्यांवरील इग्रजी शब्द, ब्रेकिंग न्यूज ला ठळक बातम्या, ब्रेक ला विश्रांती, अंकर ला सूत्रधार इ, मराठीतील शब्द वापरावयास हवेत तरच महाराष्ट्रात मुंबईत मराठीला सन्मान मिळू शकेल.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week