संरक्षित प्राणी व्हेल माशाची उलटी (Ambergris) चा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !!

संरक्षित प्राणी व्हेल माशाची उलटी (Ambergris) चा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !!

       व्हेल माशाची उलटी (Ambergris) उर्फ समुद्रात तरंगते सोने ! नमूदचा पदार्थ हा स्पेम व्हेल माशाच्या पोटात तयार होतो. ह्या पदार्थाचा वापर अति उच्च प्रतीचा परफ्युम, काही ठिकाणी औषधामध्ये तर काही ठिकाणी सिगारेट, मद्य तसेच खाद्य पदार्थामध्ये स्वाद वाढविण्यासाठी देखील केला जातो. सदरहू पदार्थांची खरेदी विक्री करणे हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियमा अंतर्गत बेकायदेशीर आहे. या पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात करोडो रुपयांमध्ये आहे.

     कक्ष ४ मुं.प्र शा. गु. अ. वि. मुंबई यांस गोपीनिय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली की काही इसम संरक्षित प्राणी व्हेल माशाच्या उलटीची खरेदी विक्रीवर शासनाने बंदी आणली असताना बेकायदेशीर रित्या मुलुंड परिसरात येणार आहेत. या बातमीची शहानिशा करून त्याबाबत वनविभागाचे अधिकारी यांचेशी संपर्क साधून त्यानां सविस्तर हकीगत समजवण्यात आली नंतर पोलीस पथक, वनविभागाचे अधिकारी यांनी १५/६/०२१ रोजी बोभाटे चाळ सालपोदेवी पाडा, बॉम्बे ऑक्सीजन कंपनीच्या मागे पी.के.रोड मुलुंड (प) या ठिकाणी छापा घातला असता तीन इसम रेड ब्राऊनिश रंगाची २.७०० किलो वजनाची व्हेल माशाची उलटी (Ambergris) २,७०,००,०००/- दोन करोड सत्तर लाख सह मिळून आले. नमुदचा पदार्थ (marine biologist) यांनी तपासून पहिला असता त्यांची खात्री झाली की सदरचा पदार्थ व्हेल माशाची उलटी आहे. सदरचा पदार्थ ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध फिर्यादी यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदरच्या प्रकरणात तीन इसमांना अटक केली आहे.


१) आरोपी धंदा कडीया काम वाणीया वाडी, सेठ हायस्कूल समोर, घनश्याम भुवन २/३ भक्ती नगर राजकोट गुजरात.


२)आरोपी वय वर्ष ६३ धंदा दलाल हिम्मत को, हा.सो.बी विंग बी ४३ मुलुंड.

३) आरोपी ५२ वर्ष धंदा टी व्ही मेकॅनिक बोभाटे चाळ सालपा देवी पाडा बॉम्बे ऑक्सीजन कंपनीच्या मागे मुलुंड.

      ह्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गु.र.क.७६/२१ कलम २३९,४४,४८अ,४९ब,५७,५१ वन्य सुरक्षा कायदा १९७२ च्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला आहे.

        सदरची कामगिरी मा.पो.सह आयुक्त गुन्हे वि.श्री. मिलिंद भारंबे, मा. अप्पर पो.आयुक्त गुन्हे श्री. एस विरेश प्रभू, मा. पो.उ आयुक्त प्रकटीकरण श्री. प्रकाश जाधव, मा स.पो.आ. (डी१दक्षिण) श्री. सोपान निगोट, यांचे मार्गदर्शना खाली प्रभारी पो. निरीक्षक【इंद्रजीत मोरे°】, पो.नि.सुर्यमोहनबोलमवाड स.पो.नि.राजेश पाटील, स.पो.नि.अजय बिराजदार, पो.ह.परब, पो.ह साळुंखे, पो.ह.बल्लाळ, पो.शि. जगताप, पो.शि. चा चव्हाण तसेच वनविभागाचे अधिकारी श्री. राजेंद्र मगमुद, A.consenvator forest  श्री. सुरेश वरग, श्री. हर्षद कर्वे (marine biologist) श्री. नथुराम कोकरे रेंज फो.ऑफिसर श्री. अमोल धागवट, फो.गार्ड यांनी उत्तम रित्या पार पाडली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week