मला हृदयात जागा !

मला हृदयात जागा !

   मला हृदयात जागा दे असे वरवर नको ठेऊ

मधे आपुल्या फुलाचेही असे अंतर नको ठेवू

तुझ्याशी बोलते हसते 

तुझ्यापाशीच घुटमळते

कुठे जाणार? मजला तूच

रस्त्यावर नको ठेवू

मनाच्या वाजती खिडक्या नि दारे,

का उदासिन तू 

असू दे  स्नेह थोडासा अशी करकर नको करू

करावित आजची कामे तशी आजच नि आत्ता तू

शहाणपणा खरा त्यातच कधी नंतर नको ठेवू

तुझ्याशी बांधला हा जीव अन आयुष्य ही माझे

जरासे प्रेम दे,हृदयावरी पत्थर नको ठेवू

प्रीती।


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी