कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह !!

कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह !!

         विरार पूर्वेकडील वज्रेश्वरी रोड वरील उसगाव येथे पाण्याच्या पिंपात कपड्याने बांधून ठेवलेला मृतदेह सापडला. असल्याची घटना ताजी असताना, शनिवारी विरार, मारंबळपाडा जेटी किनारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत  आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

        विरार पश्चिमेकडील असलेल्या मांरमबळ पाडा गावा जवळ असलेल्या जेटी जवळ एका २५ ते ३० वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेला अवस्थेत आढळला. या महिलेच्या शरीराला दगड बांधला होता. अनोळखी माणसाने तिच्या गळ्यात दगड बांधून लहान खाडीच्या पात्रात ढकलून दिले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. या तरुणीने निळ्या रंगाची पॅंट घातली होती. तरुणीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर, अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी सरकारी  रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week