
वीस हजारा साठी भाऊ व आईनेच भोसकले !!
वीस हजार रुपये दिले नाही म्हणून आईनेच मुलाला पकडून ठेवले व दुसऱ्या मुलाने त्याच्यावर चाकूने वार करीत मारहाण केल्या प्रकरणी काशी मीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सलमान नियाज अहमद कुरेशी वय (२९) वर्ष रा. पहिली शिफ्टिंग, घोडबंदर याने २ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादी वरून त्याची आई जमीला व भाऊ जावेद उर्फ जावा रा. म्हाडा बिल्डिंग पेणकरपाडा चेकनाका जवळ, विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सलमान कामावरून घरी परतला असता घरा बाहेर आई जमीला व लहान भाऊ जावेद उर्फ जावा हे दोघे थांबले होते. जावेदला वीस हजार रुपये दे असे सांगितले असता आपल्याकडे सध्या पैसे नसुन ते आले कि देतो असे सलमान म्हणाला.
तेव्हा माझी आई जमीला हिने जावेदला पैसे दे अन्यथा चांगले होणार नाही, असे सलमानला धमकावले. त्यावर जावेद ने सलमानला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने त्याच्या कमरेच्या मागच्या बाजूने चाकू काढला व सलमानच्या पोटावर, छातीवर वार केले. तर आईने सलमानला मागून पकडून ठवले होते व जावेदला ती मार सोडू नको असे सांगत होती, सलमान खाली पडल्या नंतर जावेद व आई तेथुन पळून गेले. बेशुद्ध झालेल्या सलमानला लोकांनी उचलून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.