सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी, Paytm Spoofing करून व्यवहार झाल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारास अटक !!

सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी, Paytm Spoofing करून व्यवहार झाल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारास अटक !!

  आजकाल पेटीयम द्वारे व्यवहार करणे सोईस्कर झाले असले तरी कधी कधी काही तोतया ह्याचा गैर फायदा घेत असतात व  फसवणूक करीत असतात.

           मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तलयातील सायबर गुन्हे कक्ष येथे श्री संदीप हणमंतराव शिंदे, व्यवसाय -युनिव्हर्सल हेल्थ केअर सेंटर अँड सप्लायर्स (औषध वितरक) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली की दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी मोबाईल क्रमांक ७९७७४७२४२० चा धारक याने हेडॉन या इंजक्शन ची मागणी नोंदवली व ऑनलाइन पेमेंट करणार असल्याचे सांगून त्याचे व्हाट्सअप वरून पेटीएम पेमेंट केल्याबाबतचे दोन स्क्रीनशाँर्ट  व्हाट्सअपवर तक्रारदार यांना पाठवून मोबाईल वर ऑनलाइन पेमेंट केल्याचे भासवून एकूण १७,३७० रुपयांची फसवणूक केली.

       सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक श्री शेनोळकर यांनी सदर व्यवहाराबाबत पेटीएम पेमेंट बॅंक यांच्याशी संम्पर्क साधला असता सदरचा व्यवहार हा प्रत्यक्षात न होता बनावट/फसवे Paytm Spoofing असल्याचे निष्पन्न झाले. सदर अर्जाच्या अनुषंगाने मोबाईल नंबरबाबत तपास करून संशयित आरोपी निलेश ओमप्रकाश सिंग वय वर्ष २४ पत्ता रूम नो बी २०४, शांती अकॉर्ड, गोकुळ व्हिलेज, परुळेकर जिम जवळ मिरारोड पूर्व ठाणे (भाड्याचेघर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने patym Spoofing  करून व्यवहार, पेमेंट केल्याचे भासवून तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केल्याचे कबुल केले.

     सदर तक्रारी वरून संशयित आरोपी निलेश सिंग विरुद्ध नया नगर पोलीस ठाणे येथे तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड विधान कलम ४०६, ४२० माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून आरोपी निलेश सिंग वय वर्ष २४ यास अटक करण्यात आली आहे.

        सायबर गुन्हे शाखा, मीरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्या कडून  जनतेला आवाहन करण्यात येते की मोबाईल क्रमांक ७९७७४ ७२४२० च्या धारकाकडून अश्या प्रकारे paytm Spoofing करून अथवा, अन्य बनावट पेमेंट अँपद्वारे ऑनलाइन व्यवहार करून आर्थिक फसवणूक झालेली असल्यास नया नगर पोलीस ठाण्यास, अथवा सायबर गुन्हे शाखा, मीरा- भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तलयाच्या कार्यालयाशी सम्पर्क साधावा.

       सदर ची कामगिरी डॉ. श्री महेश पाटील पोलीस उपायुक्त (गुन्हे), श्री अमोल मांडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय याच्या मार्गदर्शना खाली सायबर गुन्हे कक्ष येथील पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भिसे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, पोलीस अंमलदार गणेश इलग, पोलीस अंमलदार सुशील पवार, महिला पोलिस शिपाई सुवर्णा माळी, महिला पोलीस शिपाई पल्लवी निकम यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week