
वालीव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाची कामगिरी !
वालीव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाची कामगिरी !
सराईत गुन्हेगारांना अटक करून चोरी, घरफोडीचे एकूण चार गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत.
वसई तालुक्यातील वालीव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १२ नोव्हेंबर २१ रोजी एक वाजेपासून ते साडेचार वाजताच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने गाळा नं ई/१६ व नं.४५ बॉम्बे टॉकीज, इंडस्ट्रील इस्टेट, धुमाळ नगर, वालीव पूर्व, येथील गाळ्यांची खिडकी उचकटून त्यावाटे आत प्रवेश करून एकूण ४४,००० रुपये किंमतीचे ४ मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी केल्याने फिर्यादी यांनी अज्ञात चोरट्यां विरुद्ध वालीव पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. ह्यावरून भारतीय दंड विधान कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने वालीव पोलीस ठाणे गुन्हें प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळा वरून मिळालेली तांत्रिक माहिती व गुप्त महितीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे, दोन आरोपी नांव १) प्रवीण बलवंत गौरी, रा. महानगरपालिका शाळेच्या बाजूला, गोखीवरे, वसई पूर्व, ता. वसई, जि. पालघर, २) संदीप उमेश तिवारी, उर्फ कार्टून रा. सनसिटी शाळेच्या समोर, वाघरळपाडा, वसई पूर्व, ता, वसई, जि पालघर. यांना दिनांक १२ डिसेंबर २१ रोजी अटक करून त्यांंना विश्वासात घेऊन तपास केला असता, त्यांनी सदर गुन्ह्यांतील१६,००० रुपये किंमतीचे ४ मोबाईल असा मुद्देमाल परत केला. तसेंच खालील गुन्हे केल्याचेही कबुली दिली.
१ पोलीस ठाणे वालीव भारतीय दंड विधान कलम ४५७,३८०,३४.
पोलीस ठाणे वालीव भारतीय दंड विधान कलम ३८०
वालीव भा.द. वि कलम ४५७, आणि ३८०
वालीव पो ठाणे भा.द.वि कलम ३७९
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ २, श्री पंकज शिरसाट सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. कैलास बर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहाय्यक पो. निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मनोज मोरे, मुकेश पवार, योगेश देशमुख, पोलीस नामदार किरण म्हात्रे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे, पोलीस अंमलदार जयवंत खंडवी, गजानन गरीबे, सचिन खतार यांनी केली आहे.