
अवैधरित्या वास्तव करणाऱ्या नायजेरीन टोळीला सायबर गुन्हे शाखेने केले जेरबंद !!
अवैधरित्या वास्तव करणाऱ्या नायजेरीन टोळीला सायबर गुन्हे शाखेने केले जेरबंद !!
मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तलयातील मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्या हेरिटेज, ओसवाल बिल्डिंग च्या मागे, मिरारोड (पू) ता. जि. ठाणे या ठिकाणी संशयित नायजेरियन नागरिक हे अवैधरित्या वास्तव करीत असल्याचे, तसेच ते ऑनलाइन फसवणूक करीत असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी सायबर शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी जाऊन चौकशी केली असता १) मोसेस व्हिक्टर, (नायजेरियन) २)अबोह डिक्सन ओडू (नायजेरियन) ३) इशोला काजीम लावल (नायजेरियन) हे तिघे सध्या राहणार रूम नो.२०२, सूर्या हेरिटेज, ओसवाल बिल्डिंगच्या मागे, मिरारोड (पू) ता.जि. ठाणे हे संशयित रित्या मिळून आले. त्यांच्याकडे भारतातील वास्तव्या बाबतची कागदपत्रे मागितली असता, त्यांच्याकडे कालबाह्य झालेली कागद पत्र (व्हिसा) मिळून आला. तसेच त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे ०९ मोबाईल हँडसेट,२ लॅपटॉप, २ डोंगल, फेडरल बॅंकेचे कार्ड, २ कालबाह्य आंतराष्ट्रीय पारपत्र (व्हिसा) अश्या वस्तू मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५२/२०२१ भारतीय अधिनियम १९२० चे कलम ३, विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम ४६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तसेच सदर इसमाविरुद्ध हिमाचल येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सायबर गुन्हे शाखा, मीरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांचे कडून जनतेला आवाहन करण्यात येते की, अवैधरित्या वास्तव करणारे नायजेरियन, तसेच ऑनलाइन फसवणूक झालेली असल्यास नजीकच्या पोलीस ठाणे अथवा सायबर गुन्हे शाखा, मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा.
मिरारोड पोलीस ठाणे संपर्क
क्र. ९८२१५५३११७
पोलीस निरीक्षक .श्री विजय चव्हाण,
मोबा.९८२१५५३११७
ई-मेल आयडी:
pi.miraroad.mb-vv@mahapolice.gov.in
२) सायबर गुन्हे शाखा संपर्क क्र.
022-28110135
सायबर गुन्हे शाखा व्हाँट्सअँप हेल्पलाईन क्रमांक : 9004880135
ई-मेल आयडी
cybercrime.mb-vv@mahapolice.gov.in
सदरची कामगिरी डॉ.श्री महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे सह पोलीस आयुक्त (गुन्हे), मि. भा.व.वि पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, पोलीस उप निरीक्षक संतोष भिसे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, पोलीस अंमलदार गणेश इलग, महिला पोलीस शिपाई माधुरी धिंडे, महिला पोलीस शिपाई सुवर्णा माळी, महिला पोलीस निकम यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.