
वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची दलाली करणाऱ्या दलालास अटक !
वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची दलाली करणाऱ्या दलालास अटक !
वेश्या व्यवसायाच्या अनुषंगाने छापा करवाई करून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षास यश. वेश्या व्यवसाय तसा पाहता पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे. पुर्वी धनिक लोक गणिकेकडे जाण्यास शान मानत असत. इंग्रजांच्या काळातही त्यांच्या सैनिकांना घरा पासून दूर राहावं लागतं असे. त्यावेळेस शरीराची गरज मिटवण्यासाठी ग्रांट रोड इथे वेश्यागमन करण्याची सोय करून ठेवली होती, ग्रांट रोड येथे अजूनही इंग्रजांनी वेश्या व्यवसायाचा परवाना दिलेली गल्ली अजूनही आहे. ती तेथील वेश्या गल्ली भारत सरकार ही हलवू शकत नाही.
परंतु हल्ली वेश्या व्यवसाय पोट भरण्याच्या व्यतिरीक्त चैनीसाठी इझी मनी मिळवण्यासाठी तरुण मुली स्वेच्छेने हा रस्ता वापरतात. तर कधी गरजेपोटी अल्पवयीन मुलीही ह्यात गुरफटल्या जातात.
दिनांक 28 डिसेंबर 21 रोजी अनैतिक मानवी वाहतूक कक्ष भाईंदर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक महिला वेश्या दलाल व तिची साथीदार ह्या दोघी वेश्या गमनाच्या व्यतिरिक्त काही अल्पवयीन मुली पुरवतात व वेश्या व्यवसायाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींची दलाली करतात. असा हा व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांची माहाती, मानवी प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकास मिळाली.
दिनांक 28 डिसेंबर रोजी वेश्या दलाल व तिची साथीदार ह्या गिऱ्हाईकाना मुली पुरवीत असून अल्पवयीन मुलीला घेऊंन भाईंदर पश्चिम येथील व्हील आऊट फँमिली रेस्टॉरंट येथे येणार आहेत. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पाटील यांनी बोगस गिऱ्हाईक व पंच यांना साई केशव माधव बिल्डिंग मधील चिल आऊट फँमिली रेस्टॉरंट, कस्तुरी गार्डन जवळ भाईंदर पश्चिम या ठिकाणी पाठवुन सत्यता पडताळून, पोलीस पथका सह दुपारी दिड वाजताच्या सुमारास छापा टाकला असता महिला वेश्या दलाल व तिची एकसाथीदार यांनी अल्पवयीन मुलीबरोबर वेश्यागमन करण्याच्या बोलीवर दिड लाख इतकी भारी रक्कम ठरवून पुरुष गिऱ्हाईकाकडून रक्कम स्वीकारताना त्यांना ताब्यात घेऊन, अल्पवयीन मुलीची सुटका केली.
सदर घटनेबाबत पोलीस शिपाई केशव निवृत्ती शिंदे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही महिला आरोपी याच्या विरुद्ध भाईंदर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं.५४८/२०२१ भारतीय दंड विधान कलम ३६६ (अ), ३७० (१),(४), ३७२, ३४ सह बालकांचे लैगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम २०२१ चे कलम १७, १८, अ व्या, प्रति अधि,१९९६ चे कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ श्री. महेश पाटील उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संपतराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री शिंदे भरोसा सेल, पोलीस हवालदार विजय निलंगे, पोलीस शिपाई केशव शिंदे, महिला पोलीस शिपाई सुप्रिया तिवले, चालक पोलीस नामदार गावडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, भाईंदर व महिला पोलीस शिपाई आफ्रिन जुनेरी नेम भरोसा सेल भाईंदर यांनी पार पाडली.