गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्डयावर छापा !!

गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्डयावर छापा !!

      पालघर जिल्ह्यात गावठी हातभट्टया भरपूर प्रमाणात आहेत त्यातल्या त्यात, वसई अर्नाळा नायगाव विरार इ. ठिकाणी हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात बनवली जाते. आणि गावठी दारू सेवन करणारेही खूप आहेत.

          दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा ३ मधील अधिकारी, अंमलदार यांना माहिती मिळाली की अर्नाळा किल्ल्याच्या परिसरात अर्नाळा गावात बेकायदेशीररित्या गावठी हात भट्टीच्या दारूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अर्नाळा किल्ल्याची जेटी, मौजे अर्नाळा इथून १०० मीटर अंतरावर मोकळ्या जागेत दारूचे उत्पादन केले जात होते. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.

          सदरच्या छापा कारवाईत १,५२,७५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यात २०० लिटर क्षमतेचे  निळ्या रंगाचे प्लास्टिकचे पंप त्यात ५,४०० लिटर नवसागर, गुळ मिश्रित वाँश, तीन तांबा धातूच्या टाक्या, दोन तांबा धातूचे थाळीचा डाव (सतेले), ३५ लीटर क्षमतेचे काळ्या रंगाचे १५ प्लास्टिकचे कँन, त्यात ५२५ लिटर गावठी हात भट्टीची दारू, दोन लाकडी चाटु त्याला स्टील धातूची नळी असलेले असा मुद्देमाल जप्त करून जागेवर नष्ट करण्यात आला.

          सदर कारवाई मध्ये अज्ञात ५ ते ६ आरोपी यांच्या विरुद्ध अर्नाळा सागरी  पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र. ०८/२०२२  दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ब), (फ)  प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

          सदरची कामगिरी श्री. महेश पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे), श्री.पद्मजा बढे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक प्रमोद बडाख, वरीष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा ०३, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस नामदार सागर बारव कर, मनोज सकपाळ, सचिन घेरे, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, पोलीस अंमलदार राकेश पवार यांनी केलेली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week