
दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक करून मुद्देमाल हस्तगत !!
दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक करून मुद्देमाल हस्तगत !!
पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशा वाहन चोरी करणाऱ्या चोरांना पकडण्यासाठी पेल्हार गुन्हे प्रकटीकरण कक्षाने सापळा रचला, वरिष्ठांनी दिलेल्या सुचने नुसार व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने १) इरफान आशिक अली शेख, वय वर्ष २१, रा. धानिव बाग, नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर २) रफिक उस्मान शेख, वय वर्ष २५, रा. पेल्हार नालासोपारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर ३) विकास रमेश गुजाळ, वय वर्ष २२, नवजीवन, वसई पूर्व या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. नमूद आरोपी यांना वालीव पोलीस ठाणे, गुन्हा रजि. ११८०/२०२१ भारतीय दंड विधान कलम ३७९ या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
सदर गुन्ह्याचे आरोपी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी वालीव, नारपोली, नयानगर परिसरातून मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली असून आरोपीं कडून ६ मोटार सायकली असा एकूण २६८००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच यांच्यावर दाखल झालेले खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
वालीव पो स्टे गुन्हा रजि.११८० भारतीय दंड विधान कलम ३७९, नयानगर पो स्टे. गु.रजि.नं ४४१ भा. द. वि. कलम ३७९, नारपोली पो स्टे गु. र. नं ७६० कलम ३७९.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाघुडे पोलीस उपायुक्त परि. मंडळ ३, श्री. रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विलास चौगुले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे, महेंद्र शेलार पोलीस निरीक्षक गुन्हे पेल्हार पो. ठाणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. उप निरीक्षक सुनील पाटील, पो. हवालदार योगेश देशमुख, तुकाराम माने, पो. नामदार तानाजी चव्हाण, प्रताप पाचूंदे, पो अंमलदार संदीप शेळके, मोहसीन दिवाण, सचिन बळीद, रोशन पुरकर, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, यांनी केली आहे.