बांधकाम व्यवसायिकला लाखोंचा गंडा !!

बांधकाम व्यवसायिकला लाखोंचा गंडा !!

     जादूटोण्याच्या नावाखाली स्वतःच्या बांधकाम व्यवसायिक भागीदारालाच ४८ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाला विरार मध्ये पोलीसांनी अटक केली आहे. आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक विनोद वाघ यांनी दिली आहे.

          या प्रकरणी अंधश्रध्देला बळी पडून बांधकाम व्यवसायिकांचा ही यात मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मोहम्मद अब्दुल शकुर, उर्फ समीर कादरी वय ४१ वर्ष, असे या भोंदू बाबाचे नाव असून तो विरार पूर्व येथील गोपचर पाडा येथे राहत आहे. गास कोपरी येथे राहणारे चंद्रदीप स्वामी आणि भोंदूबाबा यांच्यात मैत्रीचे संबंध होते. स्वामी हे धर्मिक आणि अंधश्रद्धाळू असल्याचा फायदा उचलून तुला बांधकाम व्यवसायात प्रगती करायची असेल होम हवन कर असे सांगत होता. तसेच हिमालयातील बाबांशी आपली ओळख आहे, असे सांगत पूजा घालण्याच्या बहाण्याने स्वामी यांच्या मुलीचा विनयभंग केला.१९१४ पासून पूजा घालण्याच्या नावाखाली जवळपास ४८ लाखाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

             बंद खोलीत तासनतास पूजा घालत असताना धुराच्या त्रासाने छातीत आणि मेंदूचा कर्करोग झाल्याने १४ सप्टेंबर २०२१ रोजी स्वामी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर स्वामी यांची हस्त लिखित डायरी कुटुंबियांच्या हाती लागली आणि या भोंदू बाबाचा भांडाफोड झाला. तक्रारी नंतर विरार पोलीस ठाण्यात फसवणूक, विनयभंग, जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week